नवी दिल्ली: ऑडिओ ब्रँड U&i ने भारतात आपले नवीन स्मार्ट U&i Prime Shuffle 3 ला लाँच केले आहे. या नेकबँडमध्ये पॉवर कंट्रोल, सुपर फास्ट चार्जिंगसह अनेक दमदार फीचर्स मिळतील. इयरफोन १५० एमएएच बॅटरीसह येतो. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी १५ तास टिकते. तसेच ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट दिला असून, याची कनेक्टिव्हिटी रेंज १० मीटर आहे. वाचा: U&i च्या या नेकबँडमध्ये देण्यात आलेल्या दमदार टेक्नोलॉजीमुळे शानदार अनुभव मिळेल. ब्लूटूथमुळे सहज डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. नेकबँडला एकाच वेळी दोन डिव्हाइसला देखील कनेक्ट करता येईल. तसेच, फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. कंपनीचे सीईओ मीत विज म्हणाले की, सुरुवातीपासूनच आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम आणि आधुनिक प्रोडक्ट्स उपलब्ध करत आहोत. कमी किंमतीत शानदार टेक्नोलॉजीसह येणारे प्रोडक्ट्स बाजारात आणत आहोत. हे प्रोडक्ट देखील याचाच एक प्रयत्न आहे. U&i Prime Shuffle 3 शानदार अनुभव प्रदान करेल. किंमत आणि उपलब्धता U&i Prime Shuffle 3 ची किंमत २,६९९ रुपये आहे. मात्र, ग्राहक सध्या या इयरफोनला फक्त ४९९ रुपयात खरेदी करू शकतील. हा इयरफोन ब्लॅक, रेड आणि ब्लू रंगत उपलब्ध आहे. ग्राहक इयरफोनला अधिकृत वेबसाइट, आणि अन्य ऑनलाइन स्टोर्सवरून खरेदी करू शकतील. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33V1ar8