नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड () काही असे प्रीपेड प्लान आणत आहे. ज्यात खूपच कमी किंमतीचा फरक आहे. कमी किंमतीचा फरक असला तरी यासोबतच मिळणारे फायदे खूपच वेगळे आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी बीएसएनएलच्या दोन सर्वात पॉप्यूलर प्रीपेड प्लान्स ३९७ आणि ३९९ रुपयांच्या प्लान्ससंबंधी माहिती देत आहोत, जाणून घ्या डिटेल्स. BSNL चा ३९७ रुपयाचा प्लान ३९७ रुपयाचा प्रीपेड रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये यूजर्संना ६० दिवसाची वैधता सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि २ जीबी डेली डेटा मिळतो. प्लानची ओव्हरऑल वैधता ३०० दिवसाची आहे. यूजर्संला फ्री पर्सनाइलाज्ड रिंग बॅक टोन (PRBT) आणि रोज १०० फ्री एसएमएस सुद्धा मिळते. हा प्लान कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देतो. प्लानची वैधता ३०० दिवसाची असली तरी यूजर्स पीआरबीटी सोबत फक्त ६० दिवसासाठी अनलिमिटेड व्हाइस कॉल आणि डेटाचा लाभ घेऊ शकतो. BSNL चा ३९९ रुपयाचा प्लान बीएसएनएलचा ३९९ रुपयाच्या किंमतीचा एक प्रीपेड प्लान आहे. ज्यात अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस प्रति दिवस सोबत ८० दिवसाची वैधतेसाठी १ जीबी डेटा देते. प्लान्सला पाहिल्यानंतर हे स्पष्ट आहे की, ३९७ रुपयाच्या प्रीपेड रिचार्ज प्लानध्ये ३९९ रुपयाच्या प्रीपेड प्लानच्या तुलनेत जास्त लाभ मिळतो. BSNL Rs 247 vs Rs 249 प्रीपेड प्लान BSNL 249 रुपयात एक प्रीपेड प्लान आहे. यात रोज २ जीबी डेटा आणि ६० दिवसाची वैधता मिळते. यूजर्संना पहिले रिचार्ज कूपन (FRC) आहे. हे केवळ नवीन यूजर्ससाठी लागू आहे. हा प्लान रोज १०० एसएसएस सोबत येतो. रोज २ जीबी डेटा देतो. २ जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड 40 Kbps पर्यंत कमी होते. BSNL २४७ रुपयाचा प्रीपेड प्लान मध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये 50GB हाय स्पीड डेटा दिला जातो. यानंतर स्पीड८० केबीपीएस पर्यंत कमी होते. या प्लान मध्ये १०० एसएमएस देते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32I9YjN