मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहु लागले आहेत. राजकुमार राव-पत्रलेखा यांचं गेल्या महिन्यात लग्न झालं. विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. तसंच हिंदी मालिकासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंड ही देखील बॉयफ्रेंड याच्यासोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता आणि विकीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु अभिनेत्रीनं याबद्दल मौन पाळलं होतं. अखेर तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्न होत असल्याचं सांगितलं. अंकिता आणि विकी यांचं लग्न आता काही तासांवर आलं असून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अंकिता आणि विकी मराठमोळ्या पद्धतीनं लग्न करणार आहेत. या विधींचा काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवरी नटलीअंकिताचं मराठमोळं लुक लक्षवेधी ठरत आहे. हिरवा चुडा, पैठणी साडी, नाकात नथ. कपाळावर मुंडावळ्यांमुळं अंकिताचं सौंदर्य खुलून आलं आहे. हा मराठमोळा साज तिच्या चाहत्यांनाही आवडला असून या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DjytjM