मुंबई: अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. विकी आणि कतरिना राजस्थान इथं डेस्टीनेशन वेडिंग करणार असल्याच्या चर्चा होत्या याबद्दल दोघांनीही अद्यापही गुप्तता पाळली होती. त्यामुळं दोघांचं लग्न नक्की होणार की नाही? असा प्रश्नही चाहत्यांच्या मनात होता. पण विकी आणि कतरिना यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट समोर आली आहे. दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याचं नक्की झालं आहे. याबद्दलचं एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कतरिना आणि विकी यांच्या लग्नासंदर्भात सवाई माधवपूरमधील अधिकाऱ्यांनी एक पत्रक जाहिर केलं आहे. कतरिना आणि विकी यांच्या लग्नामुळं परिसरात गर्दी नियंत्रीत राखणे, करोना नियमांचे पालन या सारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे, असं यापत्रकात नमूद करण्यात आलंय. कतरिना आणि विकी यांच्या लग्नाला व्हिआयपी वर्हाडी येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त करण्यात आलाय. पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी तब्बल १०० बाउंसर असणार असून एक नियमांची यादी तयार करण्यात आली आहे. येणाऱ्या पाहुण्यांना नियम पाळावे लागणार आहेत. डिझानर कपडेकतरिना आणि विकी ९ डिसेंबरला लग्न करणार असून हे दोघे ही कोणत्या विधीला काय परिधान करतील याचीही तयारी झाली आहे.कतरिना मेहंदीसाठी अबू जानीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान करेल,तर संगीत सोहळ्यासाठी ती मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणार आहे. दरम्यान विकी कौशल मेहंदी आणि संगीताच्या दिवशी कुणाल रावल आणि राघवेंद्र यांनी डिझाइन केलेला पोशाख परिधान करणार आहे तर लग्नात तो सब्यसाचीने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणार आहे. लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून कतरीना आणि विकी लवकरच राजस्थानकडं रवाना होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xVAWjq