पुणे: मराठीतले अनेक कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये चमकत आहेत. यात नव्या फळीतल्या कलाकारांनाही संधींची दारं खुली झाली आहेत. ‘फँड्री’ या गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या राजेश्वरी खरातलाही बॉलिवूडचे तिकीट मिळालं आहे. ‘पुणे टू गोवा’ या चित्रपटातून राजेश्वरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यापूर्वी राजेश्वरीनं ‘फँड्री’, ‘आयटमगिरी’ या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अमोल भगत दिग्दर्शित ‘पुणे टू गोवा’ या चित्रपटात एका हट के भूमिकेत ती दिसणार आहे. याचबरोबर आदित्यराजे मराठे हा ही बॉलिवूडमध्ये निर्मितीत पदार्पण करत आहेत. या हिंदी चित्रपटाची निर्मिती मराठे आणि मोरया संस्था यांनी केली आहे. हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स थ्रिलर, आणि ॲक्शन अशा संमिश्र जॉनरचा असणार आहे. ‘हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणाऱ्या कलाकारांच्या पुणे ते गोवा या प्रवासावर आधारित आहे. या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या धोकादायक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे,’ अशी माहिती दिग्दर्शक अमोल भगत यांनी दिली. फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या राजेश्वरीच्या या चित्रपटातल्या भूमिकेविषय़ी उत्सुकता असेल.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xOXZMz