Karuna.Puri@timesgroup.com बऱ्याच काळापासून टीव्ही या माध्यमापासून दूर आहात, याचं काही कारण?- मी टीव्हीचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले आहेत असं नाही; पण सध्या वेब शो आणि चित्रपटांना दिलेल्या वेळामुळे मी टीव्हीसाठी काम करू शकत नाही. त्यामुळे छोट्या पडद्यापासून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. सध्या प्रेक्षक टीव्ही आणि चित्रपटांपेक्षा सीरीजना पसंती देत आहे. भविष्यात टीव्ही आणि चित्रपटांचे दर्शक कमी होतील आणि ते वेबसीरीजकडे वळतील असं वाटतं का?- मी या मताशी सहमत नाही. केवळ लॉकडाउनमुळे प्रेक्षक ओटीटीकडे वळले. लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यावर प्रेक्षक पुन्हा टीव्ही आणि चित्रपटांकडे वळत आहेत. थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहण्याची मजा वेगळीच. प्रत्येक माध्यमाचा खास अनुभव आणि स्वत:ची वेगळी मजा आहे. टीव्ही आणि चित्रपट या माध्यमाचे दर्शक मोठ्या प्रमाणात आहेत. लॉकडाउनमुळे या इंडस्ट्रीवर परिणाम झाला असता, तरी तो अल्पकालीन आहे. या इंडस्ट्री नव्यानं जोम धरत आहे. टीव्ही असो, सिनेमा असो वा ओटीटी प्रत्येकाचा वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे; त्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. चित्रपट, वेबसीरीज, टीव्ही यापैकी तुम्हाला कोणतं माध्यम आवडतं?- मी एक अभिनेता आहे आणि मला प्रत्येक माध्यम आपलंसं वाटतं. विशिष्ट असं माध्यम नाही, तर दमदार कथानक जास्त महत्त्वाचं. तुमचे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत?- पुढच्या वर्षी माझ्या तीन वेबसीरीज येत आहेत. या सोबतच मी विद्या बालनसोबत ‘जलसा’ या चित्रपटाचंही चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात मी एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मध्यंतरी तुम्ही सोशल मीडियावरून ब्रेक घेतला. या माध्यमावर परत येण्याचा विचार?- हे व्यासपीठ माझ्यासाठी नाही. सोशल मीडियानं लोकांना अक्षरश: पछाडलं आहे. सोशल मीडियाचा आनंद लुटणारे अनेक जण आहेत; पण मला त्याची फारशी गरज वाटत नाही. मी माझ्या कामातून जास्तीत जास्त प्रेक्षकांशी जोडण्याचा प्रयत्न करतो. खरं सांगायचं तर, सोशल मीडियावर वेळ घालवणं मला खूप कंटाळवाणं आणि वेळेचा अपव्ययही वाटतो. आगामी ‘’ ही सीरीज आणि पुण्यातल्या चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल काय सांगाल?- सीरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. पहिल्या भागात राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरणाऱ्या टीमला पकडण्यासाठी गोपनीय मोहीम हाती घेण्यात आली होती. आता दुसऱ्या भागात अधिक सस्पेन्स, थ्रीलर अॅक्शन पाहायला मिळेल. गेल्या आठवड्यापासून मी पुण्यात आहे. सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आणि सुंदर असं हे शहर आहे. या शहराने मोठा इतिहास पाहिला आहे, घडवला आहे. इथं ज्या पद्धत्तीने सर्व धर्मीय एकोप्यानं राहतात, संस्कृती जपतात ही गोष्ट मला विशेष आवडते. या अगोदर मी गोल्फ कोर्सवर शूटिंग केलं आहे. कोरेगाव पार्क हा भाग मला विशेष आवडतो. मराठीचं फिल्म इंडस्ट्रीवर खूप आधीपासून वर्चस्व आहे. मराठी नाटक आणि कलाकारांचा मी चाहता आहे. -
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dc6dVE