Full Width(True/False)

जोडी असावी तर अशी! निक आणि प्रियांकाच्या फोटोंवर चाहते फिदा

मुंबई- बॉलिवूडसोबत हॉलिवूडला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री आणि यांची जोडी चाहत्यांची आवडती आहे. अनेक नेटकरी प्रियांका आणि निकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास नेहमी उत्सुक असतात. त्यांच्या निरनिराळ्या फोटोंना चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभतो. नुकतंच प्रियांकाने तिच्या नावापुढील जोनस हे आडनाव काढून टाकल्याने चाहत्यांना आपल्या आवडत्या जोडीबद्दल चिंता वाटत होती. मात्र प्रियांकाने काही फोटो शेअर करत आपल्या वैवाहिक आयुष्यात सगळं काही आलबेल असल्याचं चाहत्यांना पटवून दिलं. प्रियांका आणि निकच्या अशाच काही फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या वेळेसही प्रियांकाने आपले हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटोंमध्ये प्रियांकासोबत निकदेखील आहे. प्रियांका पतीसोबत हटके पोज देत आहे. फोटोंमध्ये प्रियांकाने फ्लोरल टॉप आणि पॅण्ट घातली आहे. आणि त्यावर त्याच डिझाईनचा श्रग घेतला आहे. काळया रंगाच्या कपड्यावर मोठमोठ्या फुलांची नक्षी उठून दिसत आहे. तर निकने देखील प्रियांकाच्या कपड्यांच्या जुळणारा काळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे. फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. आपल्या आवडत्या जोडीच्या फोटोंवर चाहत्यांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने म्हटलं, 'तुम्ही एकत्र खूप गोड दिसता.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'जोडी असावी तर तुमच्यासारखी' आणखी एका युझरने लिहिलं, 'तुम्ही दोघेही वेडे आहात. आम्हाला तुम्ही खूप आवडता.' प्रियांका आणि निकच्या फोटोंवर आतापर्यंत लाखो लाइक आले आहेत. प्रियांका आणि निकचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ljGFdJ