Full Width(True/False)

किंग खानच्या बहिणीची अशी अवस्था की... ऐकून डोळ्यात येईल पाणी

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आज संपूर्ण बॉलिवूडवर राज्य करतोय. शाहरुख जणू कोट्यवधी दिलांची धडकन आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शाहरुखचं संपूर्ण कुटुंब जिथे जातं तिथे फक्त त्यांचीच चर्चा होते. मात्र शाहरुखच्या घरात अशीही एक व्यक्ती आहे जी या झगमगाटी दुनियेपासून कोसो दूर आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून शाहरुखची बहीण शहनाज आहे. आपल्या वडिलांच्या जाण्याचा शाहरुखच्या बहिणीला एवढा मोठा धक्का बसला की ती त्या धक्क्यातून अजूनही सावरू शकलेली नाही. एका मुलाखतीत शाहरुखने आपल्या बहिणीच्या अवस्थेबद्दल सांगितलं होतं. शाहरुख म्हणाला, 'मला अजूनही आठवतं की ती कशी एका जागी उभी होती आणि वडिलांचं पार्थिव पाहून बघतच बसली. ती रडली नाही. तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही ती फक्त सरळ उभी राहिली आणि धाडकन खाली कोसळली. वडिलांच्या निधनांनंतर ती कोणासोबतही बोलत नव्हती. काहीच खात नव्हती. तिची अवस्था खूप वाईट झाली होती. जणू ती जिवंत असूनही जवंत नव्हती. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाच्या वेळी तिची अवस्था इतकी बिकट झाली की तिला उपचारांसाठी परदेशात न्यावं लागलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेव्हा मी 'तुझे देखा तो ये जाना सनम' गाणं चित्रित करत होतो आणि दुसरीकडे माझी बहीण इस्पितळात होती.' पुढे शाहरुख म्हणाला, 'वडिलांच्या निधनांनंतर शहनाजला एवढा धक्का बसला की ती फक्त त्या जागेकडे पाहत बसायची जिथे माझ्या वडिलांचं पार्थिव ठेवलं होतं. वडिलांच्या मृत्यूच्या दहा वर्षांनंतर आमची आईदेखील वारली. आम्ही पोरके झालो. ती वेळ माझ्या आयुष्यातली सगळ्यात जास्त कठीण वेळ होती. आई- वडिलांच्या जाण्याने शहनाज तुटली होती. ती अजूनही नैराश्यात आहे. ती शिकलेली आहे. गौरी आणि मुलांना तिचा लळा आहे. मी देखील घरात मजा मस्ती करत असतो. मला देखील भीती वाटते की मी हसलो नाही तर तिच्यासारखा नैराश्यात जाईन.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DbCFlt