Full Width(True/False)

ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी! शिवलीलाला भेटून विशाल भावुक

मुंबई:एक घर, अनेक कॅमेऱ्यांच्या नजरा, विविध टास्क, शंभर दिवस आणि एक ट्रॉफी. 'बिग बॉस मराठी'च्या या घरात एका ट्रॉफीसाठी १७ स्पर्धकांची शंभर दिवसांपासून चाललेली लढाई अखेर संपली. विशाल निकमनं या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. संपल्यानंतर विशालनं त्याच्या शब्द खरा करत पहिल्यांदा हिची भेट घेतली. विशालनं पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं त्यानंतर शिवलीला पाटीलची भेट घेतली. दोघांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. गावरान बोली, खेळाडू वृत्तीअनेक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत राहून अनेक टास्क कसोशीनं पूर्ण करत, नॉमिनेशनच्या फेरी पार करत ''चं विजेतेपद त्यानं पटकावलं. गावरान बोली, खेळाडू वृत्ती, टास्क जिंकण्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे विशाल नेहमी चर्चेत राहिला आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांचा लाडका झालेला विशाल सर्वात आधी या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. 'प्रेक्षकांची साथ आणि विठू माऊलींच्याआशीर्वादामुळे मी ही ट्रॉफी मिळवू शकलो आहे. मायबाप रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार. माझे प्रेक्षक आहेत त्यामुळेच मी इथवर पोहोचू शकलो. त्यांच्याशिवाय हा प्रवास अशक्य होता. गावातून आलेल्या या मुलाला तुम्ही महाराष्ट्राचा लाडका बनवलं. ही एक सुरुवात आहे. मला यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाली असून याच ऊर्जेनं मी खूप काम करून प्रेक्षकांचं असंच मनोरंजन करत राहणार आहे', असं विशाल म्हणाला. विशालसह विकास पाटील आणि जय दुधाणे हे स्पर्धक अंतिम टप्प्यात पोहोचले होते. अंतिम सोहळ्याच्या शेवटच्या क्षणात विशालनं प्रथम क्रमांक पटकावला. तर जयनं दुसरं स्थान मिळवलं. विशालला 'बिग बॉस मराठी ३'च्या ट्रॉफीसह २० लाखाची धनराशीही मिळाली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eByYMj