Full Width(True/False)

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुगलने बनवले खास डुडल, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः नववर्षाची सुरुवात होण्यास आता अवघे काही तास उरले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. गुगलही यात मागे नाही. आज ३१ डिसेंबर रोजी म्हणजेच नववर्षाच्या पूर्वसंध्येला, ३१ डिसेंबर २०२१ रोजी गुगलने एक खास डुडल साकारले आहे. गुगलने या डुडलला New Year’s Eve नाव दिले आहे. गुगलचे हे डुडल खूपच आकर्षक आहे. गुगल प्रत्येक खास क्षणाचे शानदार डुडल बनवते. तसेच याला आपल्या अंदाजात सेलिब्रेट करते. नवीन वर्ष प्रत्येकासाठी खास असते. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (New Year’s Eve) लोक आनंद साजरा करतात. तसेच आपल्या खास अंदाजात नवीन वर्षाचे स्वागत करीत असतात. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुगलने एक खास डुडल साकारले आहे. डुडलला मेणबत्ती, कंफेटी (स्पार्कल) आणि जॅकलाइट्सने सजवले गेले आहे. गुगलच्या या डुडल सोबत एक खास नोट सुद्धा लिहिले आहे. १२ वाजताच गुगल डुडल ला लाइव्ह करण्यात आले आहे. गुगलच्या डुडल मध्ये २०२१ कॅप्शनचे एक कँडी दिसत आहे. गुगलने डुडलला एक पॉपिंग मेणबत्ती प्रमाणे बनवले आहे. गुगलचे हे डुडल खूपच आकर्षक बनवले गेले आहे. डुडलवर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होते. यासोबत रंगीबेरंगी पेपरचे तुकडे वरून खाली येताना दिसतात. हे खूपच आकर्षक दिसते. याशिवाय, डुडल मध्ये राइट साइडला बॉक्स मध्ये एक कोनचे एनिमेशन बनवले आहे. यावर क्लिक करताच हे फुटते. तसेच एक आवाज ऐकायला येतो. आगामी वर्ष २०२२ हे सर्वांना आनंदाचे आणि उत्साहाचे जावे यासाठी गुगलने हे डुडल साकारले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pPLUEN