Full Width(True/False)

१० वर्ष सुरू होता घटस्फोटाचा खटला; अर्नाल्ड आणि मारिया विभक्त

मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि राजकीय नेता झालेला अर्नार्ड श्वार्जेनेगर आणि त्याची पत्नी यांचा अखेर घटस्फोट झाला. गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या घटस्फोटाची केस कोर्टात सुरू होती. हॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चाललेली ही घटस्फोटाची केस आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी मंगळवारी सकाळी लाँस ऐंजिलिस येथील सुपिरियर कोर्टात झाली. न्यायमूर्तींच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या त्यानंतर कोर्टाने हे दोघे विभक्त झाल्याचे जाहीर केले. या कारणामुळे झाला मारिया अर्नाल्डचा घटस्फोट अर्नाल्ड आणि मारिया श्राइवर यांनी १९८६ मध्ये लग्न केले होते. त्यानंतर अर्नाल्डने सांगितले की, त्याच्या घरात काम करणा-या महिलेसोबत त्याचे विवाहबाह्य संबंध होते इतकेच नाही तर त्याला एक मुलगा देखील आहे. अर्नाल्डने केलेल्या या खळबळजनक खुलासामुळे सर्वांना धक्का बसला. या खळबळजनक खुलाशानंतर मारिया आणि अर्नाल्ड यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला. अखेरीस त्यांनी २०११ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत कोर्टात केस दाखल केली. दोघांनीही एकमेकांवर कोणताही आरोप न करत परस्पर सहमतीने घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली. या दोघांची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना कौटुंबिक कार्यक्रमांना हे दोघेजण त्यांच्या मुलांसह आवर्जून उपस्थित असायचे. अर्नाल्ड आणि मारिया यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया तब्बल १० वर्षे सुरू होती. ही प्रक्रिया इतकी का लांबली याचा खुलासा झालेला नाही. २०११ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता. जूनमध्ये कोर्टाने त्यावर कारवाई करायला सुरुवात केली. परंतु या सुनावणीमध्ये काय झाले याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. तसेच या दोघांमध्ये संपत्तीची विभागणी कशी झाली, सेटलमेंट कशी झाली याबाबतीही गुप्तता बाळगण्यात आली आहे. अर्नाल्ड आणि मारिया यांची मुले आता मोठी आहेत. त्यामुळे त्यांच्या कस्टडीबाबत कोणताही निर्णय कोर्टाने दिलेला नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32EuXUJ