Full Width(True/False)

JioFiber Plans: फक्त ३९९ रुपयात अनलिमिटेड हाय-स्पीड इंटरनेट, Jio च्या प्लानचा महिनाभर मोफत घेऊ शकता फायदा

नवी दिल्ली : वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेसमुळे अनेकजण ब्रॉडबँड कनेक्शनला पसंती देत आहेत. तुम्ही देखील हाय स्पीड इंटरनेटसाठी ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर एक चांगला पर्याय ठरू शकतो. जिओकडे ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा शानदार प्लान असून, यात अनेक फायदे मिळतात. वाचाः ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओफायबरचा सर्वात स्वस्त प्लान फक्त ३९९+ जीएसटीसह खरेदी करू शकता. घरी व्हिडिओ पाहणे अथवा सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी हा स्वस्त फायबर कनेक्शन प्लान आहे. या प्लानमध्ये यूजर्स ३० mbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतील. प्लानची वैधता या प्लानची वैधता ३० दिवस आहे. याद्वारे यूजर्स महिनाभर कोणत्याही अडथळ्याशिवाय हाय-स्पीड इंटरनेट वापरू शकतील. तुम्ही देखील ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर हा हाय-स्पीड इंटरनेटसह येणारा प्लान फायद्याचा ठरेल. ३० दिवसांचा फ्री ट्रायल कंपनी ३० दिवसांसाठी फ्री ट्रायल देखील देत आहे. त्यामुळे यूजर्स महिनाभर मोफत या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. मोफत ट्रायलनंतर कनेक्शन कायम ठेवायचे की नाही हे ठरवू शकता. ट्रायल दरम्यान सर्व्हिस न आवडल्यास यूजर्स दुसरी सर्व्हिस निवडू शकतात. वाचाः वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zaK1W6