Full Width(True/False)

Budget Smartphones : ७ हजारांच्या रेंजमध्ये हे आहेत टॉप ५ स्मार्टफोन्स, फीचर्सही दमदार, पाहा लिस्ट

गेल्या काही काळात बजेट सेगमेंटमध्ये येणाऱ्या फोनची विक्री वाढली आहे. आज परवडणाऱ्या स्मार्टफोनमध्येही तुम्हाला जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स मिळतात, जे तुम्हाला महागड्या फोनमध्ये मिळतात. जर तुम्ही बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, आणि स्मार्टफोन खरेदीसाठी फार खर्च करायची तुमची इच्छा नसेल तर आज आम्ही तुम्हाला तुम्ही ७००० रुपयांपर्यंत कोणता स्मार्टफोन खरेदी करू शकता याबद्दल सविस्तर सांगणार आहो. या लिस्टमध्ये समाविष्ट असलेले samsung, redmi, itel या कंपन्यांचे मोबाईल या रेंजमध्ये खरेदी करता येतात. विशेष म्हणजे या फोनची किंमत ६,१९९ रुपयांपासून ६९९९ रुपयांपर्यंत आहे. पण, जर तुम्ही हे स्मार्टफोन्स ऑनलाइन खरेदी करत असाल तर त्यावर तुम्ही अनेक प्रकारच्या ऑफर्सचा लाभही घेऊ शकता. यामध्ये कार्ड्सवरील सूट, एक्सचेंज ऑफर इत्यादींचा समावेश आहे. डिटेल्स पाहाआणि ठरवा तुमच्या बजेटमध्ये कोणता फोन फिट होतो ते.

Infinix Smart 5A
Infinix Smart 5A

कमी बजेट असणाऱ्यांसाठी हा एक मस्त पर्याय आहे. Infinix Smart 5A मध्ये ६.५२ इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच, फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० mAH ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. Infinix Smart 5A मध्ये २ GB RAM सह ३२ GB इंटर्नल मेमरी आहे. फ्लिपकार्टवर Infinix Smart 5A ची किंमत ६९९९ रुपये आहे.

Itel Vision 1
Itel Vision 1

तुम्हाला स्मार्टफोन खरेदीवर खूप पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. Itel Vision 1 ची किंमत ६,९९९ रुपये आहे. हा ड्युअल सिम 4G स्मार्टफोन आहे. यात ६ इंचाचा डिस्प्ले आहे. हे डिव्हाइस Google च्या Android 9 वर काम करते. फोनचा स्पीड चांगला ठेवण्यासाठी यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. Itel Vision1 मध्ये ४००० mAh बॅटरी आहे. स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

Redmi 9 A
Redmi 9 A

Redmi 9A एक्सचेंज ऑफरसह ६९९९ रुपयांना खरेदी करता येईल. त्याची किंमत एक्सचेंज ऑफरशिवाय ७२९९ रुपये आहे. फोनमध्ये ५००० mAH ची बॅटरी देण्यात आली आहे. Redmi 9A मध्ये २ GB RAM आणि ३२ GB इंटरनल मेमरी आहे. फोनमध्ये सिम आणि एक मेमरी कार्ड दोन्ही एकाच वेळी स्थापित केले जाऊ शकतात. हा फोन Google च्या Android १० वर चालतो. फोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. Redmi 9A मध्ये १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन Amazon वरून खरेदी करता येते.

Realme C2
Realme C2

Realme C2 तुम्हाला ६,९९९रुपयांना खरेदी करता येईल. या किंमतीत, त्याचे 2GB रॅम आणि 16GB अंतर्गत मेमरी असलेले व्हेरिएंट येते. तुम्ही ५०० अधिक खर्च करून त्याचे ३२ GB इंटर्नल मेमरी मॉडेल खरेदी करू शकता. फोनच्या चांगल्या बॅटरी बॅकअपसाठी फोनमध्ये ४००० mAH बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ६.१ -इंचाचा डिस्प्ले आहे. Realme C2 च्या मागील बाजूस डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एक कॅमेरा १३ मेगापिक्सेल आणि दुसरा २ मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ MP कॅमेरा आहे. हे Realme च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकते.

Samsung Galaxy M01 Core
Samsung Galaxy M01 Core

Samsung Galaxy M01 Core: Samsung Galaxy M01 Core ६१९९ रुपयांना खरेदी करता येईल. स्मार्टफोन ची मूळ किंमत ८,४९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स आहेत. यात ८ मेगापिक्सल्सचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ३००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे डिव्हाइस Android 10 Go वर काम करते. फोनमध्ये एकाच वेळी दोन सिम बसवता येतात. रिलायन्स डिजिटलच्या वेबसाइटवरून तुम्हाला ते खरेदी करता येईल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3IaXVeR