Full Width(True/False)

Samsung Smartphone: सॅमसंगचा सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन लाँच, मिळते ५०००mAh बॅटरी, किंमत फक्त...

नवी दिल्ली : ने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या स्मार्टफोनला अखेर लाँच केले आहे. कंपनीच्या या सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. Samsung Galaxy A13 5G च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Samsung Galaxy A13 5G चे सबस्क्रिप्शन सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच इनफिनिटी-वी एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० ऑक्टा-कोर प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. मायक्रोएसडी कार्डने स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये बॅक पॅनेलवर तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि २ डेप्थ कॅमेरा सेंसर दिला आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेंसर मिळतो. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल बँड वाय-फाय, ३.५ एमएम मिलीमीटर हेडफोन जॅक आणि एनएफसी सपोर्ट मिळतो. सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. Samsung Galaxy A13 5G Price ची किंमत २४९.९९ डॉलर्स (जवळपास १८,७०० रुपये) आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3G42UfC