Full Width(True/False)

Covid Vaccine: लस न घेतल्यास कर्मचाऱ्यांना थेट घरी बसवणार, या प्रसिद्ध कंपनीने घेतला निर्णय

नवी दिल्ली : करोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने अनेक कंपन्या परत वर्क फ्रॉम मॉडेल स्विकारत आहे. तसेच, वॅक्सिनेशनवर जोर देताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दिग्गज टेक कंपनी ने कठोर पावले उचण्यास सुरुवात केली आहे. कोविड-१९ वॅक्सिनेशनचे नियम न पाळल्यास कामावरून काढून टाकण्यात येईल, असे गुगलने कर्मचाऱ्यांना स्पष्ट केले आहे. वाचा: याबाबत CNBC ने इंटरनल डॉक्यूमेंटद्वारे दावा केला आहे. रिपोर्टनुसार, गुगलच्या लीडरशिपचा एक मेमो समोर आला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना ३ डिसेंबरपर्यंत स्टेट्सची माहिती देण्यास सांगितले होते. रिपोर्टनुसार, याबाबतची कागदपत्रं देखील द्यावी लागतील. मेडिकल सुट हवी असल्यास ३ डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला होता. तसेच, डेडलाइननंतर ज्यांचे वॅक्सिनेशन स्टेट्स अपलोड नसेल, त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. जे कर्मचारी १८ जानेवारीपर्यंत वॅक्सिनेशन नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना ३० दिवसांची पेड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सुट्टी दिली जाईल. त्यानंतर ६ महिन्यांपर्यंत अनपेड पर्सनल लिव्ह आणि त्यानंतर कामावरून काढून टाकले जाईल. रिपोर्टनुसार, याबाबत बोलताना गुगलने स्पष्ट केले की, जे कर्मचारी घेऊ शकतात, त्यांना शक्य ती मदत केली जाईल. कंपनी आपल्या वॅक्सिनेशन पॉलिसीवर ठाम आहे. दरम्यान, व्हेरिएंटमध्ये पुन्हा कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवण्याचा निर्णय गुगलने पुढे ढकलला आहे. याआधी कंपनीने कर्मचाऱ्यांना १० जानेवारीपासून ऑफिसला येण्यास सांगितले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oXW716