Full Width(True/False)

Earphones: ६० तासांपर्यंत साथ देतील हे शानदार Earphones, Boat Rockerz 330 Pro लाँच, पाहा किंमत

नवी दिल्ली : वेअरेबल ब्रँड boAt ने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी आपला नवीन ब्लूटूथ इअरफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा असा पहिला ब्लूटूथ नेकबँड इअरफोन आहे ज्याची बॅटरी लाइफ एका चार्जवर पूर्ण ६० तास म्युझिक प्लेबॅक देत असल्याचा दावा केला जात आहे . Boat Rockerz 330 Pro मध्ये तुम्हाला नेमकं काय मिळेल ते जाणून घ्या. वाचा: केवळ बॅटरी लाइफच नाही तर बोट ब्रँडचा हा नवीन इअरफोन ASAP फास्ट चार्जिंग वैशिष्ट्यासह केवळ १० मिनिटांच्या चार्जमध्ये २० तासांपर्यंत संगीत प्लेबॅक देखील ऑफर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे ब्लूटूथ इयरफोन १० मिमी डायव्हर्ससह सुसज्ज आहेत आणि ते ENx तंत्रज्ञानासह आले आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, कॉलिंग दरम्यान युजर्सला आवाजाची गुणवत्ता चांगली मिळेल असा दावा करण्यात आला आहे. Boat Rockerz 330 Pro वजनाने हलके आहे. ते आकर्षक डिझाइनसह येते. घाम आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी डिव्हाइसला IPX5 रेटिंग आहे. इयरफोन्सवर तुम्हाला प्लेबॅक आणि व्हॉल्यूम कंट्रोल बटणे मिळतील. Boat Rockerz 330 Pro ची भारतात किंमत : बोट इअरफोन्सची किंमत १४९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक ६ डिसेंबरपासून ते Amazon वरून निळ्या, काळा, लाल आणि पिवळ्या रंगात हे डिव्हाइस खरेदी करू शकतात. लाँच ऑफर अंतर्गत, प्रत्येक ६० व्या ग्राहकाला १०० टक्के कॅशबॅक मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d9eSrZ