नवी दिल्ली : चे नवीन कलर एडिशन भारतात लाँच झाले आहे. ब्लॅक कलरमध्ये हे एडिशन लाँच झाले असून, Ear 1 TWS इयरफोन्स कंपनीचे पहिले प्रोडक्ट आहे. कंपनीने सुरुवातीला याचे केवळ एकच व्हाइट कलर एडिशन लाँच केले होते. वाचा: Nothing नावाने कंपनीची सुरुवात OnePlus चे सह-संस्थापक असलेले कार्ल पेई यांनी केली आहे. Nothing Ear 1 च्या नवीन व्हेरिएंटमध्ये रंगाव्यतिरिक्त स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Nothing Ear 1 चे ब्लॅक व्हेरिएंट सेमी ट्रांसपरेंट केससह येते. यात मॅट ब्लॅक फिनिश देखील पाहायला मिळेल. Nothing Ear 1 ची किंमत ६,९९९ रुपये आहे. नवीन ब्लॅक कलर व्हेरिएंटची भारतात १३ डिसेंबरपासून ई-कॉमर्स साइट Flipkart वरून खरेदी करता येईल. कंपनीने म्हटले आहे की, इयर १ ला क्रिप्टोकरेंसीच्या माध्यमातून देखील खरेदी करता येईल. मात्र, भारतात हा पर्याय उपलब्ध नाही. इतर देशातील नागरिक याद्वारे खरेदी करू शकतील. Nothing Ear 1 च्या या व्हेरिएंटचे डिझाइन देखील समान असून, केवळ कलर आणि पॅटर्न वेगळा आहे. यात ११.६ एमएमचे डायनॅमिक ड्रायव्हर्स दिले आहेत. तसेच, अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशनचा सपोर्ट मिळेल. Nothing Ear 1 ला ANC सह वापरल्यास ५.७ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. तर चार्जिंग केससह ३२ तासांची बॅटरी लाइफ मिळेल. Nothing Ear 1 वायरलेस चार्जिंग देखील सपोर्ट करतो. म्हणजेच, वायरलेस चार्जिंग डॉक अथवा पॅडवर ठेवून चार्ज करू शकता. यात चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी पोर्ट देखील दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EgYuS8