Full Width(True/False)

Jio vs Airtel vs Vi: ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत पैसा वसूल प्लान, पाहा डिटेल्स



सध्या डेटा वापरणाऱ्यांची संख्या मोठी असून करोना काळापासून त्यात निश्चित वाढ झाली आहे. अनेक जण अजूनही घरूनच काम करीत आहेत. त्यामुळे डेटाची मोठी गरज निर्माण झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांची शाळा सुद्धा ऑनलाइन सुरू आहे. म्हणजेच व्हॅल्यू फॉर मनी डेटा प्लानची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कमी किंमतीतील टॉप व्हॅल्यू फोर मनी प्रीपेड प्लानची लिस्ट तयार केली आहे. जाणून घ्या डिटेल्स. ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत जिओचे बेस्ट प्लानजिओचा २९९ रुपयाचा प्लानहा प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये डेली २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहकाला ५६ जीबी डेटा मिळतो. हा अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेली १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. हा प्लान २० टक्के जिओमार्ट कॅशबॅक ऑफर सोबत येतो. याअंतर्गत जिओच्या प्रीपेड ग्राहकांना २०० रुपयाचा कॅशबॅक मिळतो.


Jio vs Airtel vs Vi: ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत पैसा वसूल प्लान, पाहा डिटेल्स


जिओचा ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लान
जिओचा ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लान

जिओचा २३९ रुपयाचा प्लान

हा प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये डेली १.५ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, पॅक अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेली १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

जिओचा १९९ रुपयाचा प्लान

हा प्लान २३ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये डेली १.५ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ३४ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, या पॅक मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.



​एअरटेलचा २९९ रुपयाचा प्लान
​एअरटेलचा २९९ रुपयाचा प्लान

एअरटेलच्या या प्लानमध्ये यूजर्संना २८ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये डेली १.५ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच यूजर्संना एकूण ४२ जीबी डेटा दिला जातो. या पॅक मध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत डेली १०० एसएमएस, अमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे ३० दिवसाचे फ्री सब्सक्रिप्शन, फास्टॅग रिचार्जवर १०० रुपये कॅशबॅक, फ्री विंक म्यूझिक सबस्क्रिप्शन आणि फ्री शॉ अकादमी सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते.



एअरटेलचे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान
एअरटेलचे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान

एअरटेलचा २०९ रुपयाचा प्लान

हा प्लान २१ दिवसांच्या वैधते सोबत येतो. यात डेली १ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच एकूण २१ जीबी डेटा मिळतो. पॅक मध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेली १०० एसएमएस, अमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे ३० दिवसासाठी फ्री सब्सक्रिप्शन आणि फ्री विंक म्यूझिक सबस्क्रिप्शन देते.

एअरटेलचा १५५ रुपयाचा प्लान

हा प्लान २४ दिवसाच्या वैधते सोबत येतो. यात डेली १ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. या पॅकमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, डेली १०० एसएमएस, अमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे ३० दिवसाचे फ्री सब्सक्रिप्शन आणि फ्री विंक म्यूझिक सबस्क्रिप्शन सुद्धा दिले जाते.



​Vi चे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे बेस्ट प्लान
​Vi चे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे बेस्ट प्लान

Vi चा २९९ रुपयाचा प्लान

हा प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये डेली १.५ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच एकूण ४२ जीबी डेटा दिला जातो. पॅक मध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेली १०० एसएमएस, २ जीबी पर्यंत बॅकअप डेटा, विकेंड डेटा रोल ओव्हर सुविधा आणि व्हीआय फिल्म आणि टीव्हीचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा देते.

Vi चा १९९ रुपयाचा प्लान

हा प्लान १८ दिवसाच्या वैधतेसोबत येतो. यात डेली १ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच एकूण १८ जीबी डेटा दिला जातो. या पॅक मध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेली १०० एसएमएस आणि व्हीआय फिल्म आणि टीव्हीचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा देते.





from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pvp19g