नवी दिल्ली: देशातील आघाडीची नेटवर्क प्रदाता कंपनी रिलायन्स ने आपल्या प्रीपेड Plans च्या किमती वाढवल्या आहेत. आणि Vodfone आयडिया या अन्य नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांनी टॅरिफमध्ये वाढ केल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला असून दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे आहे की नेटवर्कची चांगली गुणवत्ता आणि व्यवसाय पाहता ही किंमत वाढवण्यात आली आहे. वाचा: दरवाढीनंतरही Jio, Airtel आणि vodafone आयडियापेक्षा अधिक परवडणारी आहे. आज आम्ही या तिन्ही कंपन्यांच्या बेस प्लानमध्ये तुलना करत आहोत. जिओचा बेस प्लॅन ९१ रुपयांपासून सुरू होतो, तर Vodafone Idea आणि Airtel ९९ रुपयांपासून. Jio ने ७९ रुपयांच्या प्लानची किंमत ९१ रुपयांपर्यंत वाढवली आहे, जी १ डिसेंबरपासून लागू होईल. Jio चा ९१ रुपयांचा प्लान : जिओच्या ९१ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ३ जीबी डेटा दिला जातो. व्हॉईस कॉलिंगसाठी या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त या प्लानमध्ये 50 एसएमएस देण्यात आले आहेत. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Plan Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security अॅप्सवर मोफत प्रवेश देते. Airtel चा ९९ रुपयांचा प्लान : Airtel च्या ९९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण २०० एमबी डेटा दिला जातो. कॉल्ससाठी यामध्ये ९९ रुपयांचा टॉकटाइम उपलब्ध आहे. व्हॉईस कॉलिंगसाठी, हा प्लान १ पैसे प्रति सेकंद कॉल चार्ज करतो. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या मध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. Vodafone- Idea चा ९९ रुपयांचा प्लान : व्होडाफोन आयडियाच्या ९९ रुपयांच्या प्लान मध्ये ९९ रुपयांचा टॉकटाइम उपलब्ध आहे. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये एकूण २०० एमबी डेटा देण्यात आला आहे. कॉलिंगसाठी, हा प्लान १ पैसे प्रति सेकंद कॉल आकारतो. वैधतेच्या बाबतीत, यामध्ये २८ दिवसांची वैधता देण्यात आली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31k1LBC