Full Width(True/False)

New Rules from 1st December: ऑनलाइन पेमेंट ते DTH रिचार्ज... आजपासून बदलणार हे ४ नियम, ग्राहकांच्या खिश्यावर पडणार भार

वर्षातील शेवटचा महिना आजपासून सुरू झाला आहे. मात्र, या महिन्यापासून तुमचे आर्थिक नियोजन बिघडू शकते. कारण आज म्हणजेच १ डिसेंबरपासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल झाला आहे. यात प्रामुख्याने ऑनलाइन सेवांचा समावेश आहे. यात ऑनलाइन पेमेंटपासून ते जिओच्या रिचार्ज प्लानसह चार महत्त्वाच्या सेवांचा समावेश आहे. टेलिकॉम कंपनी एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्यानंतर जिओने देखील जवळपास ५०० रुपयांपर्यंत दर वाढवले आहेत. हे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. या सर्व सेवांच्या किंमतीमध्ये २० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे तुमच्या महिन्याच्या खर्चामध्ये जवळपास ५० टक्के वाढ होईल. म्हणजेच, तुमचा या सेवांसाठीचा महिन्याचा खर्च १ हजार रुपये असल्यास, तो वाढून आता १,५०० रुपये होईल. कोणत्या सेवांच्या किंमती वाढणार आहेत, ते जाणून घेऊया.

​Jio रिचार्ज प्लान
​Jio रिचार्ज प्लान

टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना सर्वात मोठा झटका दिला आहे. एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्यानंतर रिलायन्स जिओने देखील दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे नवीन प्लान्स १ डिसेंबर २०२१ पासून देशभरात लागू होतील. कंपनीच्या प्लानमध्ये ४८० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. जिओचा बेसिक प्लान ७५ रुपयांवरून ९१ रुपये झाला आहे. तर ३६५ दिवस वैधतेसह येणारा २,३९९ रुपयांचा प्लान आता २,८७९ रुपयांचा झाला आहे.

​DTH रिचार्ज
​DTH रिचार्ज

जर तुम्हाला टीव्ही पाहण्याची आवड असल्यास आजपासून काही ठराविक चॅनेल्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. यूजर्सला STAR PLUS, COLORS, SONY, ZEEसारखे चॅनेल्स पाहण्यासाठी ५० टक्के जास्त पैसे द्यावे लागतील. सध्या या प्लान्सची सरासरी किंमत ४९ रुपये आहे, जी आता ६९ रुपये महिना करण्यात आली आहे. Sony चॅनेल पाहण्यासाठी ३९ रुपयांऐवजी ७१ रुपये दरमहिना द्यावे लागतील. तर ZEE चॅनेलसाठी ३९ रुपयांऐ वजी ४९ रुपये मोजावे लागतील. इतर चॅनेल्सच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे.

​Amazon Prime रिचार्ज
​Amazon Prime रिचार्ज

ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime ने देखील मेंबरशिप प्लान्समध्ये बदल केला आहे. कंपनीने प्लान्सच्या किंमती वाढवल्या असून, नवीन किंमती १४ डिसेंबरपासून देशभरात लागू होतील. अ‍ॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनमध्ये ५० टक्के वाढ झाली आहे. सध्या ९९९ रुपये किंमत असलेल्या वार्षिक प्लानसाठी १,४९९ रुपये मोजावे लागतील. तसेच, तीन महिन्यांचा प्लान ३२९ रुपयांऐवजी ४५९ रुपयांचा होईल. मासिक प्लानसाठी १२९ रुपयांऐवजी १७९ रुपये द्यावी लागतील. मात्र, Amazon Prime मेंबरशिप प्लानसाठी ऑटो रिन्यू पर्याय निवडलेल्या ग्राहकांवर याचा परिणाम होणार नाही.

​SBI क्रेडिट कार्ड
​SBI क्रेडिट कार्ड

मोबाइल रिचार्ज आणि डीटीएच रिचार्जप्रमाणेच आता SBI ने देखील ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. SBI चे क्रेडिट कार्ड वापरून काहीही खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिक शुल्क लागणार आहे. १ डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करणे महाग होईल. यूजर्सला कार्डचा वापर करून खरेदी केल्यास प्रत्येक खरेदीवर ९९ रुपये व अतिरिक्त टॅक्स द्यावा लागेल. हा प्रोसेसिंग चार्ज असेल. आजपासून बदलणाऱ्या या किंमतीमुळे ग्राहकांच्या खिश्यावर भार पडणार आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3loC0qG