Full Width(True/False)

Mobile Recharge Plans: एक महिन्याच्या रिचार्जमध्ये २८ दिवसांची वैधता का मिळते? जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या , आणि (Vi) या एक महिन्याच्या रिचार्जच्या नावावर ग्राहकांना ३० ऐवजी २८ दिवसांची वैधता ऑफर करतात. याच प्रमाणे दोन महिन्यांच्या रिचार्जमध्ये ५४ अथवा ५६ दिवसांची वैधता मिळते.तर तीन महिन्यांच्या रिचार्जमध्ये ९० दिवसांऐवजी ८४ दिवसांची वैधता दिली जाते. मात्र, या मागील कारण तुम्हाला माहितीये का? याबाबत सविस्तर जाणून घेऊया. वाचाः एक महिन्याच्या रिचार्जच्या नावाखाली मिळते २८ दिवसांची वैधता टेलिकॉम कंपन्या एक महिन्याच्या रिचार्जमध्ये २८ दिवसांची वैधता देतात. यामुळे कंपन्यांना याचा मोठा फायदा होतो. ग्राहकांना वाटते की वर्षभरात आपण १२ महिन्यांचा रिचार्ज करतो. मात्र, खरे तर २८ दिवसांच्या वैधतेनुसार वर्षभरात १२ नाही तर १३ महिन्यांचा रिचार्ज करत असतो. कारण, दरमहिन्याला दोन दिवसांची कमी वैधता असल्याने अखेर २८ दिवस बाकी राहतात. वर्षभरात फेब्रवारी सोडल्यास २२ दिवस अतिरिक्त बाकी राहतात. ३१ दिवसांचा महिना असल्यास ३ दिवस अतिरिक्त वाचतात. त्यामुळे अतिरिक्त दिवसांची संख्या २८ आणि २९ दिवस होते. त्यामुळे ग्राहकांना १३ महिने रिचार्ज करावा लागतो. अशा स्थितीमध्ये कंपन्यांना याचा फायदा होतो. ५६ दिवसांची रिचार्ज याच प्रमाणे दोन महिन्यात ५६ दिवसांची वैधता दिली जाते. अखेर २४ दिवस अतिरिक्त राहतात. सोबतच, ३१ दिवसांचा महिना असल्यास अतिरिक्त ६ दिवस बाकी राहतात. त्यामुळे तुम्हाला १३ महिने रिचार्ज करावा लागतो. ८४ दिवसांचा रिचार्ज तीन महिन्यांच्या नावाखाली ८४ दिवसांची वैधता दिली जाते. त्यामुळे २४ दिवस अतिरिक्त बाकी राहतात. सोबतच, ३१ दिवसांचा महिना असल्यास ७ दिवस अतिरिक्त राहतात. अशा प्रकारे ३१ दिवस बाकी राहिल्याने, एक्स्ट्रा रिचार्ज करावा लागतो. म्हणजेच, ग्राहकांना वर्षाला एक महिन्यांचा अतिरिक्त रिचार्ज करावा लागतो व यामुळे कंपन्यांचा फायदा होतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yd5BIX