नवी दिल्ली: प्रत्येक कुटुंबासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे. त्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील असतो. यासोबतच तुम्ही रेशनकार्डमधून अनेक प्रकारच्या सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. मात्र, त्यात तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचं जर नुकतंच लग्न झालं असलं किंवा तुमच्या घरात एखादं मूल असेल ज्याची माहिती रेशन कार्डमध्ये नसेल, तर तुम्ही ती अपडेट करून घेऊ शकता. वाचा: विशेष म्हणजे याबाबत माहिती नसेल तर सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशात, आज आम्ही तुम्हाला रेशन कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करायचे ते सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुमचे रेशन कार्ड अपडेट करू शकता. ऑनलाइन कसे अपडेट करावे: यासाठी, तुम्ही तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठ्याच्या अधिकृत साइटवर जाऊन आयडी बनवावा लागेल. येथे तुम्हाला Add New Member चा पर्याय मिळेल यावर क्लिक केल्यावर एक फॉर्म उघडेल. तुम्ही येथे कुटुंब तपशील जोडू शकता. फॉर्मसह दस्तऐवजाची सॉफ्ट कॉपी अपलोड करा. फॉर्म सबमिट . केल्यानंतर नोंदणी क्रमांक दिला जाईल. पोर्टलवरून या फॉर्मचा मागोवा घ्या. कागदपत्रे आणि फॉर्मची पडताळणी करा. फॉर्म स्वीकारल्यास पोस्टाद्वारे तुमच्या घरी येईल. आधार, पॅन, मतदार कार्ड प्रमाणेच शन कार्ड खूप महत्वाचे आहे. हे कार्ड प्रत्येकाने ते बनवणे बंधनकारक आहे. सरकारी सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड असणे आवश्यक आहे. त्यात तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती असते. जर तुमच्या कुटुंबात नवीन सदस्य सामील झाला तर त्याचे नाव देखील जोडणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याचे नाव समाविष्ट करायचे असेल तर तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o7eb8Q