Full Width(True/False)

प्रेक्षकांचा हा आवडता अभिनेता 'देवमाणूस २'मध्ये दिसणार नाही, कारण आलं समोर

मुंबई: ‘’ या मालिकेनं चांगला टीआरपी मिळवला. अनेक प्रेक्षक न चुकता ही मालिका पाहत होते. मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता किरण गायकवाडच्या अभिनयाचंही कौतुक झालं. लोकप्रिय ठरलेली ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे. दुसऱ्या भागात पहिलाच डॉक्टर असेल, की कथा वेगळं वळण घेईल हे अजून गुलदस्त्याच आहे. पहिल्या सीझनच्या यश हे संपूर्ण टीमचं होतं. केवळ मुख्य भूमिकेतील अभिनेता नव्हे तर सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळं पहिल्या सीझनमधील सर्व कलाकार पुन्हा दिसणार की नाही, या बद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. परंतु आता पहिल्या सीझनमधील एक कलाकार या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार नसल्याचं म्हटलं जात आहे. डॉ. अजित कुमार देव, बज्या, नाम्या, डिंपल , टोन्या, सरु आजी यां सर्वांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. परंतु यातील हे पात्र साकारणारा अभिनेता आता देवमाणूस मालिकेत दिसणार नसल्याचं म्हटलं जात आहे. किरण सध्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत भूमिका साकारतोय. त्यामुळं तो देवमाणूसमध्ये दिसणार की नाही? हे अद्यापही समजू शकलं नाही. पहिल्या सीझनमध्ये बज्याचं पात्र विशेष चर्चेत आलं होतं.पैलवान बजरंग पाटील ही भूमिका आणि एक डायलॉग विशेष गाजला होता. बज्याचा एका बुक्कीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31aoP6b