Full Width(True/False)

पडता- पडता वाचला Salman Khan चा बर्थडे केक, पाहा Video

मुंबई : ने काल २७ डिसेंबरला ५६ वा वाढदिवस साजरा केला. २७ तारखेच्या मध्यरात्रीपासूनच त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला सुरुवात झाली होती. सलमानच्या पनवेल येथील अर्पिता फार्महाऊसवर जोरदार पार्टी झाली. या पार्टीला त्याच्या घरातील सदस्यांसह मनोरंजन विश्वातील त्याचे मित्रमंडळीही उपस्थित होते. या पार्टीतील काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच सलमान केक कापतानाचा एक व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये सलमान आणि त्याची भाची आयत एकत्र केक कापताना दिसत आहेत. परंतु सलमानने इतक्या जोरात तो केक कापला की तो कापत असताना खाली पडेल की काय असंच वाटत होतं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान भाची आयतसोबत केक कापताना दिसत आहे. विशेष म्हणजे आयतचा जन्मही २७ डिसेंबरलाच झाला होता. त्यामुळे तिच्या जन्मानंतर सलमान आणि आयत यांचा वाढदिवस एकत्रितपणेच साजरा केला जातो. आयत ही सलमानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा यांची मुलगी आहे. व्हिडिओमध्ये सलमान आणि आयत मल्टी लेअर असलेला केक एकत्रितपणे कापताना दिसत आहे. परंतु केक मोठा असल्याने कापताना फार हलत होता. एकाक्षणी केक खाली पडतो की काय असंच वाटत होतं. मात्र सलमानने मोठ्या कौशल्याने केक कापला. सलमानच्या जवळ उभा असलेला आयुष केक सांभाळताना दिसत आहे. सलमानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मंडळी आवर्जून उपस्थित होते. त्यामध्ये रितेश देशमुख, जेनेलिया डिसुजा, बॉबी देओल, संगीता बिजलानी, सैफ अली खान, निखील द्विवेदी, रजत शर्मा, वत्सल सेठ, अलवीरा खान, अतुल अग्निहोत्री यांचा समावेश होता. दरम्यान, सलमान खानला वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शनिवारी साप चावला होता. त्यामुळे त्याला सात तास हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवले होते. त्यानंतर रविवारी सकाळी त्याला हॉस्पिटलमधून घरी सोडले. आता सलमानची तब्येत उत्तम आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ECj9iK