Full Width(True/False)

'मॉनिटर' हर्षद नायबळचं मालिकाविश्वात पदार्पण; 'या' मालिकेत झळकणार

मुंबई :आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातल्यानंतर गायक आणि बालकलाकार आता मालिकाविश्वात पदार्पण करतोय. येत्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या '' या नव्या मालिकेत तो पिंकी या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहे. दिप्या असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पिंकी आणि पिंकीची लहान बहीण निरीला नेहमी साथ देणारा असा हा लाडका भाऊ आहे. वयानं लहान असला तरी तितकाच समंजस आणि वडिलांच्या मेहनतीची जाण असलेला हा दिप्या आहे. हर्षदला गाण्याची आवड तर आहेच. मात्र या मालिकेच्या निमित्तानं त्याची अभिनयाची आवडही जोपासली जाणार आहे. 'पिंकीचा विजय असो' ही त्याची पहिलीच मालिका आहे. तो या भूमिकेसाठी उत्सुक आहे. सेटवर हर्षद सर्वांचा लाडका असून तो त्याच्या गाण्यानं सर्वांचच मनोरंजन करत असतो. नव्या वर्षात हर्षदचा नवा अंदाज प्रेक्षकांना कसा वाटतोय; हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pzPLpm