नवी दिल्ली: Flipkart टीव्ही डेज सेल १ डिसेंबरपासून सुरू झाला असून आज सेलचा शेवटचा दिवस आहे . विक्रीदरम्यान स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. फ्लिपकार्ट सेल दरम्यान, वर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. जर तुमचे बजेट कमी असेल आणि मोठ्या स्क्रीनसह स्मार्ट टीव्ही शोधत असाल तर याहून चांगली संधी मिळणार नाही. वाचा: सेल दरम्यान, Mi, Samsung, Realme आणि इतर ब्रँडच्या टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त ४० -इंचाच्या स्मार्ट टीव्हीबद्दल सविस्तर माहिती देत आहोत. सेलमध्ये KODAK ४०-इंचाचा स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात खरेदी करता येईल. पाहा डिटेल्स. इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही: ऑफर आणि सूट KODAK 7X Pro 40 इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीची लाँच किंमत २०,९९९ रुपये आहे, परंतु विक्रीदरम्यान टीव्हीवर ११ % सूट मिळत आहे. म्हणजेच हा टीव्ही १८,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. पण, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून टीव्ही आणखी स्वस्तात खरेदी करता येतो. सिटी बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १५०० रुपयांपर्यंत पर्यंत सूट मिळेल. बँक टीव्हीवर १० % पर्यंत सूट देत आहे. जर तुम्ही पूर्ण ऑफ मिळवू शकला तर टीव्हीची किंमत १६,९९९ रुपये असेल. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. KODAK 7X Pro 40 इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर एक्सचेंज ऑफर: KODAK 7X Pro 40 इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर ११ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला तब्बल ११ हजारांची ऑफर मिळू शकते. तुमच्या टीव्हीची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच तुम्हाला ही सूट मिळेल. अशा प्रकारे जर तुम्ही फुल ऑफ मिळवू शकत असाल तर, ५,६९९ रुपयांत हा दमदार स्मार्ट टीव्ही घरी आणू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31qbaYr