नवी दिल्ली : स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. अ‍ॅमेझॉन इंडियावर हा प्रीमियम १३ हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह मिळेल. १३ हजार रुपयांचे डिस्काउंट हे ५ हजार रुपये कूपन डिस्काउंट आणि ८ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट ICICI बँक अथवा कोटक बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास मिळेल. याशिवाय एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास फोनवर १९,९५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. वाचा: 9 5G चे फीचर आणि स्पेसिफिकेशन स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंच फ्लूइड एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. हा डिस्प्ले २०:९ आस्पेक्ट रेशियो आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळत आहे. यात स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ड्यूल एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मोनोक्रोम लेंस मिळेल. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फेस अनलॉक आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह येणाऱ्या या फोनमध्या वॉर्प चार्ज ६५टी फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ ५.२, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी ३.१ झेन १ टाइप-सी पोर्ट मिळेल. यात ड्यूल नॅनो सिम सपोर्टसह ड्यूल स्टीरियो स्पीकर आणि डॉल्बी एटमॉस दिले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3efSZrq