नवी दिल्ली : हँडसेट निर्माता कंपनी ने आपल्या सीरिज अंतर्गत आणकी एक नवीन Tecno Camon 18T ला लाँच केले आहे. या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आणि दमदार बॅटरी दिली आहे. फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Tecno Camon 18T चे स्पेसिफिकेशन्स ड्यूल सिम (नॅनो) सपोर्टसह येणाऱ्या या फोनमध्ये ६.८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४६० पिक्सल आणि पीक ब्राइटनेस ५०० निट्स आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर तीन रियर कॅमेरे दिला असून, याचा मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल, दुसरा २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर दिला आहे. सेल्फीसाठी यात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात मीडियाटेक डायमेंसिटी जी८५ ऑक्टाकोर प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, जीपीएस, ओटीजी, एफएम रेडिओ आणि वाय-फायचा सपोर्ट मिळतो. सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेंसर आणि एआय वॉइस असिस्टेंटचा सपोर्ट दिला आहे. Tecno Camon 18T ची किंमत या स्मार्टफोनला सध्या पाकिस्तानात लाँच केले आहे. इतर बाजारात कधी लाँच केले जाईल याची अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. फोनची किंमत २७,९९९ PKR (जवळपास ११,९०० रुपये) आहे. फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनला डस्क ग्रे, सॅरेमिक व्हाइट आणि आइरिस पर्पल रंगात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D88fk5