नवी दिल्ली: मेसेजिंग अॅप टेलिग्रामने वर्ष २०२१ च्या अखेरच्या दिवशी एक मजेशीर फीचर जारी केले आहे. चे हे फीचर Apple च्या सारखे आहे. याद्वारे यूजर्स मेसेजवर रिएक्ट करू शकतील. तसेच, टेक्स्टमधील काही भाग हाइड देखील करता येईल. या फीचरला Spoiler नाव दिले आहे. वाचा: याशिवाय टेलिग्रामने मेसेज ट्रांसलेशन फीचर देखील जारी केले आहे. आणि Signal सह इतर मेसेजिंग अॅपमध्ये अद्याप ट्रांसलेशन फीचर आलेले नाही. यूजर्स आता मेसेजवर रिएक्ट करू शकतील. हे फीचर आधीपासूनच iMessage, Facebook Messenger आणि Instagram वर उपलब्ध आहे. टेलिग्रामने यूजर्ससाठी इमोजी उपलब्ध केले असून, याचा वापर करून मेसेजवर रिएक्ट करता येईल. कोणत्याही मेसेजवर इमोजीद्वारे रिएक्ट करण्यासाठी यूजरला केवळ मेसेजवर डबल टॅप करावे लागेल. अशाप्रकारे यूजर्स Thumbs Up ने रिएक्ट करू शकतील. दुसऱ्या इमोजीद्वारे मेसेजवर रिएक्ट करण्यासाठी यूजरला मेसेजवर एकदा टॅप करावे लागेल. यानंतर लिस्टमधून इमोजी सिलेक्ट करू शकतील. या फीचरचा वापर खासगी चॅटमध्ये करता येईल. ग्रुप आणि चॅनेलमध्ये अॅडमिन फीचरला डिसेबल अथवा एनेबल करू शकतात. Spoiler फीचरद्वारे यूजर्स टायपिंग दरम्यान काही शब्द हाइड करू शकतात. याद्वारे ठराविक शब्द, चॅट लिस्ट आणि नॉटिफिकेसनमधून हाइड होतील. टेलिग्रामने Message Translation फीचर जारी केले आहे. याद्वारे अॅपमध्येच मेसेजला दुसऱ्या भाषेत भाषांतर करता येईल. यासाठी सेटिंग्समध्ये Languages पर्याय एनेबल करावा लागेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32IJxKF