Full Width(True/False)

VIDEO: ही आमची सून...जेव्हा जया बच्चन यांनी करिश्माची करून दिली होती ओळख

मुंबई: बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची लग्नं, अफेअर्स , ब्रेकअप्स आणि घटस्फोट नेहमीच चर्चेत असतात. अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या काही महिन्यांच घटस्फोट घेतल्याचं पाहायला मिळालं. तर काही जोडप्यांचं नातं साखरपुड्यानंतर तुटलं. अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या नात्याची एकेकाही प्रचंड चर्चा झाली होती. दोघांचा साखरपुडा झाल्याचंही म्हटलं गेलं होतं. मात्र नंतर काही कारणांमुळं हे नातं तुटलं. यांनी साखरपुड्यानंतर नात्याला नकार दिला असंही म्हटलं जातं. जया बच्चन यांच्यामुळं अभिषेक आणि करिश्माचं नातं संपुष्टात आल्याचं म्हटलं जातं. परंतु जया यांनीच एक मोठ्या कार्यक्रमात स्वत: करिश्माची ओळख बच्चन कुटुबियांची सून अशी करून दिली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. जया बच्चन यांनी करिश्माला सून म्हणून हाक मारल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर करिश्मासाठी हा सुखद धक्का होता. दरम्यान, या कार्यक्रमात जया यांनी आता बच्चन कुटुंबाचं कपूर कुटुंबाशी संबंध जोडले जाणार असल्याचं म्हटलं होतं. करिश्माची आईही ठरली कारणकरिश्मा आणि अभिषेकचे नाते का तुटले? हे आजपर्यंत कोणालाच कळू शकलं नाहीए. पण करिश्माची आई बबीता अभिषेकच्या बॉलिवूडमधील करिअरवर खूश नव्हत्या असं म्हटलं जातं. त्याचवेळी बच्चन कुटुंबही आर्थिक संकटांचा सामना करत होते, म्हणूनच करिश्माचं भविष्य सुरक्षित असावं, अशी बबीता यांची इच्छा होती, असं म्हटलं जातं. जया बच्चन यांनी उत्तर देणं टाळलंअभिषेक आणि करिश्मा यांचं नातं तुटल्यानंतर जया बच्चन यांनी या विषयावर बोलणं टाळलं होतं. परंतु करिश्माच्या संस्कारांमुळं नातं तोडलं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, काही काळा मौन बाळगून जया बच्चन यांनी म्हटलं होतं की, 'करिश्मामध्ये कपूर घराण्याचे रक्त आहे. तिचे वडील व मी चांगले मित्र आहोत. त्यांचे माझ्या पतीसोबतही चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबीयांना दोष देणे योग्य ठरणार नाही'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3px7KMO