Full Width(True/False)

Video- कतरिना कैफची सामानाची कार पोलिसांनी थांबवली

मुंबई- आणि यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, कतरिना आणि विकी यांच्यासंबंधी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये वाहतून पोलिसांनी कतरिनाची गाडी थांबवल्याचं दिसतं आणि तपासणीनंतर गाडीला जाऊ दिलं. याशिवाय आणखी काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये कतरिनाच्या घराबाहेर गाड्या उभ्या असलेल्या दिसत आहेत आणि नववधू लग्नासाठी निघण्याच्या तयारीत आहेत. सवाई माधोपूरच्या चौथ का बरवरा येथील हॉटेल सिक्स सेन्स फोर्टमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. रविवारी संध्याकाळी कतरिना विकीच्या घरी निघाली असता, तिला वाहतूक पोलिसांनी अडवले. या प्रसंगाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात वाहतूक पोलीस चालकाची चौकशी करताना दिसत आहेत. याशिवाय आणखी काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये कतरिनाच्या घराबाहेर अनेक गाड्या उभ्या असलेल्या दिसत आहेत. या गाड्यांमध्ये नवऱ्या मुलीचं सामान ठेवलं जात आहे. कतरिना आणि तिचं कुटुंबीय आज राजस्थानला रवाना होत आहेत, जिथे हळद, संगीत आणि लग्न होणार आहे. सलग तीन दिवस कतरिना आणि विकीचं लग्न चालणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3In33N0