Full Width(True/False)

WhatsApp Features: २०२१ मध्ये लाँच झालेल्या 'या' भन्नाट WhatsApp फीचर्सने वाढविली चॅटिंगची मजा

नवी दिल्ली: लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफार्म ची युजर्समध्ये प्रचंड क्रेझ आहे. गेल्या वर्षी मध्ये WhatsApp ने अनेक आश्चर्यकारक फीचर्स लाँच केले. यादरम्यान, व्हॉट्सअॅपवरून यूजर्सच्या गोपनीयतेच्या फीचर्सवर खूप भर देण्यात आला होता. याच वर्षात व्हॉट्सअॅपला चॅट लीक झाल्याच्या आरोपाचा सामना देखील करावा लागला होता. हेच लक्षात घेत २०२१ मध्ये WhatsApp फीचर्स लाँच केले आहेत. जाणून घेऊया सविस्तर. वाचा: WhatsApp Payment: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, WhatsApp पेमेंट फीचर २०२१ मध्ये WhatsApp युजर्ससाठी सादर केले. सध्या, हे वैशिष्ट्य भारतातील सर्व व्हॉट्सअॅप युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे वैशिष्ट्य युजरना UPI द्वारे पैसे पाठवू आणि प्राप्त करण्यास अनुमती देते. जागतिक स्तरावर हे फीचर फार पूर्वी लाँच करण्यात आले होते. परंतु, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला WhatsApp पेमेंट्सबद्दल काही चिंता होत्या, ज्यामुळे त्याचे लाँच होण्यास उशीर झाला. Multi-Device Support : व्हॉट्सअॅपचे मल्टी-डिव्हाइस समर्थन वैशिष्ट्य सर्व युजर्ससाठी आणले गेले आहे. या फीचरमुळे एका व्हॉट्सअॅप अकाउंटला चार डिव्हाइसपर्यंत लॉग इन करता येते. हे वैशिष्ट्य युजर्सना दुय्यम डिव्हाइसवर लॉग-इन करण्याची परवानगी देते जेव्हा प्राथमिक डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट केलेले नसते. डिसअपियरिंग मीडिया फाइल्स: व्हॉट्सअॅप डिसअपियरिंग मीडिया फाइल्स अलीकडेच लाँच करण्यात आल्या आहेत. या फीचरमुळे युजर्स मीडिया फाइल एकदाच पाहू शकतात. यानंतर मीडिया फाइल डिलीट होते. इन्स्टाग्राममध्येही असेच फिचर देण्यात आले आहे. हे वैशिष्ट्य चॅट सेटिंग्जमध्ये Automatically सक्षम केले जाऊ शकते. : हे व्हॉट्सअॅपचे प्रायव्हसी अपडेट आहे. जे युजर्सचे स्टॉकिस्टपासून संरक्षण करते. म्हणजे नवीन फीचर आल्यानंतर कोणताही अनोळखी व्यक्ती Last सीन पाहू शकणार नाही. यासाठी एव्हरीवन, नोबडी आणि माय कॉन्टॅक्ट्स असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. Preview Voice message : हे फीचर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. या फीचरमुळे व्हॉईस नोट पाठविण्यापूर्वी ऐकता येते. तसेच, व्हॉईस नोट्स एडिट करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DXJ2cH