Full Width(True/False)

'फुलाला सुगंध मातीचा' मध्ये तेजश्री प्रधानची एंट्री; दिसणार 'या' भूमिकेत

मुंबई :'' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेच्या सुरुवातीपासूनच येणारी रंजक वळणं प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास यशस्वी ठरत आहेत. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे. या मालिकेत लवकरच अभिनेत्री हिची एंट्री होणार आहे. शिर्डीमधल्या आनंद जत्रेत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असं मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या स्पर्धेत कीर्ती सहभागी होणार असून या स्पर्धेच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत तेजश्री प्रधान दिसेल. तेजश्री सेलिब्रिटी होस्ट म्हणून या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. ही स्पर्धा कीर्तीसाठी अतिशय महत्त्वाची असून तिच्या बुद्धीमत्तेची आणि हजरजबाबीपणाची कसोटी पाहणारी ठरेल. आता कीर्ती ही स्पर्धा जिंकेल का? तिला तेजश्री कशी मदत करणार? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3E3qPuo