Full Width(True/False)

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले भन्नाट फीचर, पाठवण्याआधी ऐकता येणार Voice Messages

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म ने साठी नवीन फीचर आणले आहे. या फीचरद्वारे वॉइस प्रीव्ह्यूचा पर्याय मिळेल. यूजर्स WhatsApp वर वॉइस मेसेंज सेंड करण्याआधी ऐकू शकतील. यामुळे योग्य वॉइस मेसेज पाठवण्यासाठी मदत मिळेल. वाचा: WhatsApp चे वॉइस मेसेजेस फीचर लोकप्रिय आहे. यामुळे वॉइस मेसेंज करण्याची व ऐकण्याची सुविधा मिळते. आतापर्यंत WhatsApp वर वॉइस मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर पुन्हा ऐकता येत नव्हते. मात्र, आता नवीन फीचरमुळे वॉइस मेसेज पाठवण्याआधी यूजर्सला ऐकता येणार आहे. यासाठी तुम्हाला WhatsApp वर एखादा व्यक्ती किंवा ग्रुप चॅट ओपन करावे लागेल. चॅट ओपन केल्यानंतर मायक्रोफोनवर टच करा आणि स्लाइड अप करून हँड्स-फ्री रेकॉर्डिंगला लॉक करा. त्यानंतर तुम्ही वॉइस रेकॉर्ड करू शकता. बोलणे पूर्ण झाल्यानंतर स्टॉपवर टॅप करा. आता तुम्ही प्लेवर टॅप करून रेकॉर्डिंग करू शकता. यूजर्स टाइम स्टँपद्वारे रेकॉर्डिंगच्या कोणताही भाग ऐकू शकतील. रेकॉर्डिंग न आवडल्यास ट्रॅशवर टॅप करून वॉइस मेसेजला डिलीट करता येईल. जर तुम्हाला वॉइस मेसेज योग्य वाटत असल्यास सेंडवर क्लिक करून इतर यूजर्सला पाठवू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33vVC6q