नवी दिल्ली : Facebook च्या मालकीचे इंस्टंट WhatsApp चा जगभरातील कोट्यावधी यूजर्स वापर करतात. मात्र, याचा वापर अनेक चुकीच्या कामासाठी देखील केला जातो. अशा अकाउंट्सवर कंपनी वेळोवेळी कारवाई करत असते. आता ने पुन्हा एकदा अशाच २० लाख अकाउंट्सवर कारवाई केली आहे. वाचा: कंपनीने ऑक्टोबर महिन्याच्या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात ५०० तक्रारी आल्या. या कालावधीत कंपनीने २,०६९,००० भारतीय अकाउंट्सला बॅन केले. चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी ही कारवाई केली आहे. WhatsApp च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अंतर्गत कंपनीने पाचव्या मासिक अहवाल सादर केला आहे. हा रिपोर्ट ऑक्टोबर महिन्याचा आहे. बॅन केलेल्या अकाउंटमध्ये ९५ टक्के ऑटोमेटेड अथवा बल्क मेसेजिंगचा (स्पॅम) अनाधिकृत वापर करणाऱ्या अकाउंटचा समावेश आहे. WhatsApp दर महिन्याला जगभरात सरासरी ८० लाख अकाउंट्सवर बंदी घालत आहे. सप्टेंबर महिन्यात देखील कंपनीने २० लाखांपेक्षा अधिक अकाउंट्सवर बॅन केले होते. यावेळी ५६० तक्रारी आल्या होत्या. दरम्यान, नवीन आयटी नियमांतर्गत ५ मिलियनपेक्षा जास्त यूजर्स असणाऱ्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्सला दर महिन्याला रिपोर्ट जारी करणे गरजेचे आहे. WhatsApp आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि इतर आर्ट टेक्नोलॉजी क्षेत्रात गुंतवणूक करत आहे. कंपनी डेटा सायंटिस्ट आणि तज्ञांवर देखील मोठी गुंतवणूक करत आहे. जेणेकरून, प्लॅटफॉर्म यूजर्ससाठी सुरक्षित राहिल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3od6FsT