नवी दिल्ली : खात्यात जमा केलेले पैसे तुमचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम करतात. तुमचेही EPFO मध्ये खाते असल्यास, तुमच्या PF खात्यात आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत यासारख्या काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या PF खात्यात जमा केलेल्या पैशावर किती व्याजदर आहे? या सर्व गोष्टीं कडे लक्ष देणे देखील अत्यंत आवश्यक आहे. वाचा: आज आम्ही तुम्हाला ईपीएफ पासबुकबद्दल सविस्तर सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पीएफ खात्याशी संबंधित सर्व माहिती सहज मिळवू शकता. इंटरनेटवरून डाउनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. ईपीएफ पासबुक डाउनलोड करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या ईपीएफ पासबुक कसे डाउनलोड करावे ?
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2l8mi4m ला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला UAN च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचे आवश्यक डिटेल्स टाकावे लागतील.
- ही प्रक्रिया केल्यानंतर Get Authorization Pin या पर्यायावर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्ही टाकलेल्या तपशीलांची पडताळणी करावी लागेल.
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. बॉक्समध्ये ओटीपी टाकल्यानंतर, तुम्हाला Validate OTP and activate हा पर्याय निवडावा लागेल.
- तुमचा UAN सक्रिय झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्डसह एसएमएस येईल.
- हा पासवर्ड वापरून तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता.
- UAN सक्रिय झाल्यानंतर सुमारे ६ तासांनंतर तुम्ही तुमचे EPF स्टेटमेंट पाहू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EfXD3T