नवी दिल्ली : , आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लान्स सादर करत आहे. कंपन्यांकडे डेटा, कॉलिंग बेनिफिट्ससह येणारे अनेक प्लान्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा प्लान शोधत असाल तर तिन्ही कंपन्यांकडे असा एक प्रीपेड प्लान आहे. वाचा: , जिओ आणि वोडाफोन आयडियाकडे ४७९ रुपये किंमतीचा प्लान आहे. मात्र, यामध्ये मिळणारे बेनिफिट्स वेगवेगळे आहेत. या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. Jio चा ४७९ रुपयांचा प्रीपेड प्लान Jio च्या ४७९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा यानुसार एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. डेली डेटा समाप्त झाल्यानंतर स्पीड ६४ Kbps होईल. प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud या अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. Airtel चा ४७९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या ४७९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा यानुसार एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. यात दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय Prime Mobile Edition Free Trail, Apollo 24|7 Circle, Shaw Academy, Hellotunes, Wynk Music Free आणि Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळतो. Vodafone Idea चा ४७९ रुपयांचा प्लान Vodafone Idea च्या ४७९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज १.५ जीबी मिळतो. या प्लानची वैधता देखील ५६ दिवस आहे. यामध्ये दररोज ८४ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये बिंज ऑल नाइट डेटा, विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies & TV Classic एडिशन मिळते. तसेच, प्लानमध्ये दर महिन्याला २ जीबी डेटा बॅकअप देखील मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n8QNqt