Full Width(True/False)

रणवीरचा ८३ थिएटर बाहेर, छोट्या पडद्यावरूनही आली परतीची वेळ

मुंबई : हिंदी सिनेविश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून चं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. रणवीरने '' या गेम शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. परंतु या गेम शोला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लवकरच हा कार्यक्रम निरोप घेणार आहे. तसेच रणवीरच्या '' या सिनेमालाही फारसं यश मिळालं नाही. हा सिनेमादेखील हळूहळू चित्रपटगृहांतून बाहेर पडत आहे. एकूणच नवीन वर्षाची सुरुवात रणवीरसाठी फारशी दिलासादायक ठरली नाही. छोट्या पडद्यावरून प्रसारित होणारा 'द बिग पिक्चर' कार्यक्रमाचा हा शेवटचा आठवडा आहे. शनिवारी प्रसारित होणाऱ्या भागात शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा सहभागी होणार आहे. तर रविवारच्या भागामध्ये करण जोहर आणि अभिनेत्री काजोल सहभागी होणार आहेत. फोटोंच्या माध्यमातून नशीब बदलण्याची संधी देणाऱ्या कलर्स वाहिनीच्या 'द बिग पिक्चर' या रिअॅलिटी शो ने पहिल्या सिझनमध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. असं असलं तरी या कार्यक्रमाला टीआरपीची गणितं काही सोडवता आली नाहीत. वास्तविक या कार्यक्रमाकडून वाहिनीला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. कलर्स वाहिनीसमोर भविष्यात मोठी स्पर्धा असणार आहे ती म्हणजे झी टीव्ही आणि सोनी टीव्ही एकत्र येणार आहे. त्यामुळे या दोघांच्या एकत्र येण्याने या वाहिनीसमोर मोठी स्पर्धा असणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती बानीजे एशिया यांनी सलमान खानच्या टीव्ही कंपनी एसके टीव्हीच्या संयुक्त विद्यमाने केली आहे. या आठवड्याअखेरीस कार्यक्रमाचं पहिले पर्व संपणार आहे. या कार्यक्रमात मनोरंजन विश्वातील अनेक नामवंत मंडळी सहभागी झाली होती. अंतीम सिनेमाच्या प्रमोशनसाठी खुद्द सलमान खान देखील या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याचप्रमाणे एकता कपूर, मौनी रॉयसह सहभागी झाले होते. शनिवारच्या भागामध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा सहभागी होणार आहेत. यावेळी शत्रुघ्न सिन्हा रणवीरसोबत माखन चोर गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत. आपल्या वडिलांना अशाप्रकारे नाचताना सोनाक्षीने पहिल्यांदा पाहिले आहे. त्यावर तिने हा रणवीर इफेक्ट असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमात सोनाक्षीने एक मजेशीर किस्सा सांगितला. तिने सांगितले की, तिच्या वडिलांना एका चाहत्याने ट्विटरवर विचारले होते की, तुमचा बायोपिक आला तर तुमची भूमिका कुणी साकारावी असे तुम्हाला वाटते. त्यावर शत्रुघ्न यांनी रणवीरचं नाव घेतलं होतं. हे ऐकून रणवीर खूपच आनंदित झाला आणि उत्साहाच्या भरात नाचू लागला. त्याच्या या उत्साहाला आवर घालण्यासाठी सोनाक्षीने त्याला सांगितले की, अर्थात त्यासाठी ऑडिशन द्यावी लागणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32ZVRqn