नवी दिल्ली : Amazon ला सुरुवात झाली असून, या सेलमध्ये आयफोन मॉडेल्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. हा सेल २० जानेवारीपर्यंत चालणार आहे. मेंबर्ससाठी हा सेल १६ जानेवारीपासूनच सुरू झाला आहे. सेलमध्ये आयफोनसह अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी ईएमआयची देखील सुविधा मिळेल. या सेलमध्ये ला ग्राहक स्वस्तात खरेदी करू शकतात. फोनवरील ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: iPhone 12 ची किंमत iPhone 12 ला सेलमध्ये फोनच्या ६४ जीबी स्टोरेज मॉडेलला ३ हजार रुपये डिस्कांउंटनंतर ५३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनची मूळ किंमत ५६,९९९ रुपये आहे. Prime मेंबर्ससाठी हा फोन स्वस्तात उपलब्ध आहे. याशिवाय फोनवर १४,९०० रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंटचा देखील फायदा मिळत आहे. ग्राहकांना जुन्या फोनवर १४,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास ५३,९९९ रुपये किंमतीचा हा फोन फक्त ३९,०९९ रुपयात खरेदी करता येईल. मात्र, एक्सचेंज ऑफर जुन्या फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून आहे. म्हणजे, जेवढा हाय-एंड स्मार्टफोन असेल तेवढा जास्त फायदा मिळेल. iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स डिस्प्ले: Apple iPhone 12 मध्ये ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला आहे. या हँडसेटमध्ये सिरेमिक शिल्ड आहे. प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये ए१४ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट मिळतो. कॅमेरा: फोनमध्ये एडवांस्ड ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड आणि वाइड कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यामध्ये नाइट मोड, ४के डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंगची सुविधा मिळते. वॉटर रेसिस्टेंटसाठी फोनला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3KbHeBb