मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेल्या यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सतत येत होत्या. मात्र, यात तथ्य नव्हते. दरम्यान, या कपलला छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. मलायका आणि अर्जुनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघे एकत्र दिसत आहेत. मलायका अरोरा आणि रविवारी दुपारी एकत्र लंच डेटवर गेले होते. छायाचित्रकारांनी जोडप्याला मुंबईतील वांद्रे येथील रेस्टॉरन्टबाहेर पाहिले. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर जोडप्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मलायकाने रफल्ड व्हाइट ड्रेस घातला होता, तर अर्जुनने निळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि डेनिम घातली होती. गेल्या आठवड्यात मलायका आणि अर्जुन यांचे ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर अर्जुनने त्या अफवांना पूर्णविराम दिला आणि इन्स्टाग्रामवर मलायकासोबतचा एक फोटो शेअर केला. त्यासोबत त्याने लिहिले की, 'अफवांना जागा नाही. सर्वजण सुरक्षित रहा, आनंदी रहा. लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो.' याला उत्तर देताना मलायकानेही कमेन्टमध्ये हार्ट इमोजी शेअर केले होते. अर्जुन कपूर आणि मलायका तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे हॉट जोडपं अनेकदा एकत्र फिरताना आणि सुट्टीवर जाताना दिसतं. यासोबतच दोघंही नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलत आले आहेत. दरम्यान, अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही ते विभक्त झाल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3IekvlU