Full Width(True/False)

शम्मीजी जर आज इथे असते, तर... ‘सारेगमप’च्या मंचावर हेलन झाल्या भावुक

मुंबई: ‘’चं नवं पर्व सध्या गाजतंय. येत्या भागात विशेष अतिथी म्हणून नामवंत ज्येष्ठ नर्तिका, अभिनेत्री कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात व्रज आणि राजश्री या स्पर्धकांनी ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटातील सादर केलेल्या ‘ओ हसीना झुल्फोंवाली जाने जहाँ’ या जबरदस्त गाण्यामुळे हेलन भारावून गेल्या. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणनेही हेलन यांना या गाण्यातील त्यांच्या लूक आणि नृत्याबद्दल काही प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी शम्मी कपूर आणि पती सलीम खान यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. व्रज आणि राजश्री यांच्या गाण्याबाबत त्या म्हणाल्या, 'शम्मीजी जर आज इथे असते, तर तुमचं गाणं ऐकून त्यांना प्रचंड आनंद झाला असता. आम्ही दोघांनी अनेक गाण्यांमध्ये एकत्र काम केलंय. ते स्वभावानं खूप खट्याळ होते. ते आम्हां सर्वांना सेटवर भरपूर हसवत असत. या गाण्याच्या नृत्यासाठी आम्ही आठ-दहा वेळा तालीम केली होती. शम्मीजी यांची नृत्याची स्वत:ची अशी शैली होती. पण ते नृत्याची तालीम कधीच करत नसत.' त्यांनी सलीम खान यांच्याविषयीही एक आठवण सांगितली. 'या चित्रपटात सलीम यांनी छोटीशी भूमिका रंगवली आहे. यामध्ये ते शम्मीजींचे वादक साथीदार म्हणून पाहायला मिळतात. ओ हसीना झुल्फोवाली या गाण्यातही त्यांनी ड्रम वाजविला आहे', असं त्या म्हणाल्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32TVsG5