Full Width(True/False)

नवीन वर्षातही ओटीटीवर महिलाराजच; या सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई टाइम्स टीम चित्रपटात हिरो हवाच, हे समीकरण गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदललं. कंगना रणोटचा 'क्वीन', आलिया भटचा 'राझी', सोनम कपूरचा 'वीरे दी वेडिंग', राणी मुखर्जीचा 'मर्दानी' या चित्रपटांनी प्रेक्षकांना बॉक्स ऑफिसवर खेचून आणलं. वेबजगतातही हा ट्रेंड कायम राहिला. कंगना रणोटचा 'थलैवी', क्रिती सेननचा 'मिमी', तापसी पन्नूचा 'रश्मी रॉकेट', विद्या बालनचा 'शेरनी' हे चित्रपट ओटीटीवर (ओव्हर द टॉप) कमालीचे गाजले. आपल्या दमदार अभिनयानं या अभिनेत्रींनी ओटीटीवर स्वतःचं असं हक्काचं स्थान निर्माण केलं. पुनरागमन आणि पदार्पण सुश्मिता सेनने 'आर्या' या वेब सीरिजमधून मनोरंजनविश्वात पुनरागमन केलं. 'आर्या २' हा दुसरा सीझनही तितकाच हिट ठरला. आता तिसऱ्या सीझनची जोरदार तयारी सुरू आहे. रिचा चड्ढानं 'कँडी' या सीरिजमधून हट के भूमिका केली. तर 'अरण्यक' ही रविना टंडनची पहिली वेब सीरिज होती. या दोन्ही सीरिजचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. २०२२चा धमाका या वर्षात वेबविश्वात स्त्री पात्रांना मध्यवर्ती भूमिकेत ठेवून अनेक अनोखे प्रयोग पाहायला मिळतील. 'कौन बनेगी शिखरवती' या सीरिजमध्ये , आणि या तिघींच्या मुख्य भूमिका आहेत. तर '' या सीरिजमधून शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी भेटीला येणार आहेत. धकधक गर्ल माधुरी दीक्षित 'फाइंडिंग अनामिका' या सीरिजमधून या वर्षात ओटीटीवर पदार्पण करणार आहे. शिल्पा शेट्टीसुद्धा २०२२मध्ये ओटीटीवर भेटीला येणार आहे. पण तिच्या वेब सीरिजचं नाव अजूनही गुलदस्यात आहे. लवकरच येत आहेत… संजय लीला भन्साळी या वर्षात प्रथमच एक वेब सीरिज दिग्दर्शित करणार आहेत. ही सीरिज स्वातंत्र्यपूर्व काळावर आधारित असल्याचं बोललं जातंय. तर आनंद नीलकंठ यांच्या पुस्तकावर आधारित 'बाहुबली बिफोर द बिगिनिंग' या सीरिजचीसुद्धा प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. या दोन्ही सीरिजमध्ये अभिनेत्रींची प्रमुख भूमिका असण्याची दाट शक्यता आहे. अभिनेत्री ठरताहेत हिट! महिलाप्रधान विषयांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय. ओटीटीची गणितं प्रेक्षकपसंतीवर अवलंबून असतात. त्यामुळे स्त्री व्यक्तिरेखा मध्यवर्ती असलेल्या अनेक सीरिज आणि सिनेमे २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतील. ओटीटी या माध्यमामुळे कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. चंदेरी पडद्यावर झळकण्याची प्रत्येकाला संधी मिळतेच, असं नाही. अनेक अभिनेत्रींनी वेब सीरिजमधून यशस्वीरीत्या अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. - गिरीश जोहर, निर्माते आणि चित्रपट व्यवसाय तज्ज्ञ संकलन : गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3HODaVu