Full Width(True/False)

तू माझ्यासाठी नेहमीच... थोरल्या भावाच्या निधनानं महेश बाबू भावुक

मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूवर सध्या दुहेरी संकट आलं आहे. त्याला करोनाची लागण झाली असतानाच त्याचे बंधू रमेश बाबू यांचे निधन झालं आहे. रमेश बाबू यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या क्वारंटाइन असून त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. महेश बाबूला करोना झाल्यानंतर तो क्वारंटाइन झाला होता. भावाच्या निधनानं त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यानं त्याचं दु:ख सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळे आहे, तू माझं प्रेरणास्थान आहे, माझी शक्ती, धैर्य सर्वस्व आहेस. माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी खूप धन्यवाद असं महेश बाबूनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. रमेश बाबू यांनी १९७४ मध्ये 'अल्लुरी सीताराम राजू' या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी जास्त चित्रपट केले नसले तरी १५ अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. १९९७मध्ये त्यांनी अभिनयाला राम-राम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांनी महेश बाबूसाठी अर्जुन आणि अतिथी या दोन चित्रपटांची निर्मिती केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nanq7g