Full Width(True/False)

वाचन , व्यायाम आणि बरंच काही... मराठी कलाकारांनी शेअर केले नव्या वर्षाचे संकल्प

: नाटक, सिनेमा यांमधून पुरेसा वेळ काढत वाचनावर जास्त भर द्यायचा आहे. वाचनामुळे कामामध्ये नवीन काही तरी करण्याची ऊर्जा, प्रेरणा मिळते. म्हणूनच येत्या वर्षात वाचनावर अधिक वेळ घालवणार आहे. संदीप पाठक : दररोज काही ना काही वाचलं पाहिजे. म्हणूनच येत्या वर्षात वाचनावर मी अधिक लक्ष देणार आहे. नवनवीन पुस्तकांमधून मला इतरही काही गोष्टींचा अनुभव जाणून घ्यायचा आहे. : रोजचा जाणारा दिवस, त्यामध्ये घडणाऱ्या अनेक घटना याचा आपण आनंद घेत नाही. म्हणूनच येत्या वर्षात मी ठरवलंय की, छोट्या-छोट्या घटनांमधून आनंदाचे क्षण साजरे करायचे. तो दिवस मजेत घालवण्यासाठी प्रयत्न करायचा. सायली संजीव : व्यग्र वेळापत्रकामुळे व्यायामाचं चक्र पुढे-मागे होतो. येत्या वर्षात काटेकोरपणे व्यायाम तसंच स्वतःकडे लक्ष देण्याचा प्रयत्न असेल. अश्विनी कासार : मागील वर्षात करोना आणि काही कारणांमुळे अनेक ठिकाणी जाता आलं नाही आहे. म्हणून नवीन वर्षी अनेक निसर्गरम्य ठिकाणं तसंच नवनवीन जागा फिरण्याचा माझा संकल्प आहे. अमृता पवार : मला आधीपासून गाड्यांची भीती आहे. दुचाकी गाड्यांवर तर मी बसतही नाही. ही भीती मला चार चाकी गाडी चालवायला शिकून घालवायची आहे. नवीन वर्षात गाडी शिकण्याचा मी संकल्प केला आहे. भाग्यश्री मोटे : नवीन वर्षात आरोग्याकडे लक्ष देणार आहे. वैविध्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी उत्तम आरोग्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देणार आहे. संकलन : रामेश्वर जगदाळे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31imgyX