Full Width(True/False)

मलायका अरोराने घातला असा ड्रेस की...नेटकऱ्यांनी केला लाइक्सचा वर्षाव

मुंबई- बॉलिवूडची स्टाइलीश अभिनेत्री म्हटल्यावर पहिलं नाव मलायका आरोराचं येतं. मलायका चित्रपटसृष्टीतून लांब असली तरी वेगवेगळ्या करणांमुळे सतत चर्चेत असते. कधी तिच्या चालण्याच्या पद्धतीवरुन तर कधी तिने घातलेल्या कपड्यांवरुन तिला ट्रोल करण्यात येतं. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्या आयुष्यातील खास क्षणांचा अपडेट देत असते. मलायका अरोराने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोमध्ये, मलायकाने पारदर्शक ड्रेस घालून सोफ्यावर बसून पोझ देताना दिसली. मलायकाने वनपीस घतला आहे. तिचा हा वनपीस पारदर्शक आहे . या ड्रेसला साजेल अशी तिने हेअर स्टाईल केली आहे. मलायकाचा या हटक्या अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत. हा फोटो शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये 'कवर मी इन सनशाइन', असं लिहिलेलं आहे. तिच्या या लूकचं चाहते कौतुक करत आहेत. ती या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत असल्याचं चाहत्यांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मलायकाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोत मलायका अरोरा विचित्र ड्रेस घालून पोझ देताना दिसली. या फोटोमध्ये तिने शॉर्ट स्कर्टसह कोट घातला होता. तिचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला होता. मलायकाला अनेकदा तिच्या कपड्यांवरुन ट्रोल केलं गेलं आहे. या ट्रोलर्स विषयी बोलताना मलायकाने सांगितलं होतं की, 'मी मूर्ख नाही. मला माहीत आहे की मला काय चांगलं दिसतं. जर का तसे कपडे घालून मला बरं वाटतं असेल तर इतरांनी ते स्वीकारलं पाहिजे. महिलांना नेहमी त्यांच्या स्कर्टची लांबी किंवा त्यांच्या नेकलाइनवरून बोललं जातं. माझ्या नेकलाइनबद्दल लोक काय म्हणतात त्यानुसार मी माझं आयुष्य जगू शकत नाही. मी काय घालावं हा अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे. तुमची जशी विचारसरणी आहे तशी माझी नसेल. माझी वैयक्तिक निवड माझी असावी. तुम्ही बसून निर्णय घेऊ शकत नाही', असं तिने सांगितलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/TR14ryGv0