मुंबई- करोनाने पुन्हा मन वरती काढली आहे. सामान्य माणसांप्रमाणे अनेक कलाकारांना ही करोनाची लागण झाली आहे. तसंच ते यातून बाहेरही आले आहेत. मात्र आता बॉलिवूड अभिनेत्री काजलही करोनाची लागण झाली असल्याची बातमी समोर येत आहे. काजोल देवगणची कोविड चाचणी देखील पॉझिटीव्ह आली आहे. तिने ही माहिती स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. काजोलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला करोनाने त्याच्या विळख्यात ओढलं असल्याची माहिती दिली आहे. काजोलने ही पोस्ट शेअर करत असताना तिचा स्वतःचा फोटो शेअर न करता तिच्या मुलीचा न्यासा देवगणचा फोटो शेअर केला आहे. तसंच मुलीचा फोटो शेअर करण्या मागचं कारण ही सांगितलं आहे. मुलीचा फोटो शेअर करत काजोलने लिहिले,' माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे आणि माझे लाल नाक कोणीही पाहू नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणून आपण या जगातील गोड हास्य सोबत ठेऊयाच. मिस यु न्यासा.’ करोना झाला असताना काजोलला तिच्या लेकीची आठवण येत आहे. काजोल ला करोनाची लागण झलायच कळताच सोशल मीडियावर चाहते स्वतःची काळजी घे असा सल्ला देताना दिसत आहेत. दरम्यान तिच्याकामा बाबत बोलायचं झालं तर गेल्या वर्षी तिची 'त्रिभंग' नावाची वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. तसंच ती 'द लास्ट हुर्रे' या चित्रपटात ही काम करणार आहे. काजोलची मुलगी न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/ET4cXmNWM