Full Width(True/False)

सर्दीची गोळी ठरलं कारण; 'टार्जन' फेम अभिनेते हेमंत बिर्जे यांचा भीषण अपघात

मुंबई: 'टार्जन' फेम अभिनेते यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातात त्यांची पत्नी आणि मुलगीही जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर हेमंत आणि त्यांच्या कुटुंबियांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई एक्स्प्रेवेवर मुंबईहून पुण्याला जाताना उर्से टोलनाक्याच्या हद्दीत अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताचं कारण समोर आलं असून हेमंत यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी सर्दीवरच्या गोळ्या खाल्ल्याचं सांगितलं. वातावरणात झालेल्या बदलामुळं हेमंत यांना सर्दी झाली होती. त्यामुळं त्यांनी कुटुंबियांसोबत पुण्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला . प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी सर्दीवरच्या दोन गोळ्या खाल्ल्या होत्या. गोळ्या खाल्ल्यानंतर त्यांनी प्रवास सुरू केला. पण हेच त्यांच्या अपघाताचे कारण ठरलं आहे. मुंबई -पुणे महामार्गावर गाडी चालवत असताना सर्दीच्या गोळ्यांमुळं त्यांना झोप येऊ लागली. अचानक डुलकी लागल्यानं हेमंत यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी दुभाजकाला धडकली. अपघातात हेमंत बिर्जे त्यांची पत्नी आणि मुलगी हे तीन जण जखमी झाले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3HYAV1I