Full Width(True/False)

तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती.., तो व्हिडिओ पाहून रश्मिका मंदानाचे चाहते भडकले

मुंबई- साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा:द राइज'मध्ये रश्मिका मंदानाने पुष्पाच्या प्रेयसी श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात श्रीवल्लीची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली. साऊथसोबतच हिंदी चाहत्यांनाही तिची ही भूमिका आवडली आहे. रश्मिका मंदान काल रात्री करण जोहरला भेटायला गेली, पण निघताना जे घडले ते काही चाहत्यांना आवडलेलं नाही आहे आणि ते तिच्यावर नाराज झाले आहेत. झालं असं की करण जोहरला बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर काही गरीब मुलं तिच्याकडे गेली आणि काहीतरी द्या म्हणत तिच्या पाठी लागली. रश्मिका मंदाना हैराण झाली आणि मग तिच्या स्टाफने तिला तिकडून बाहेर काढलं तुरंत यानंतर आणखीन मुलं आली आणि तिच्या गाडी जवळ जाऊन उभी राहहिली, तर काहीनी मुलांनी तिच्या चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. एक मुलगी रश्मिकाचं कौतूक करत म्हणाली- अरे दीदी, पुष्पा तुझा फोटो आहे का? यानंतर एक मुलगी म्हणते - काहीतरी दे आणि जा दीदी, जेवायला. मात्र, यानंतर रश्मिकाची गाडी पुढे निघून जाते. रश्मिकाचा हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे. यात रश्मिकाचं असं वागणं पाहून चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिलं , 'हे पाहून मूड ऑफ झाला' आणखीन एक यूजर म्हणाला, 'हे लोक पैशाने श्रीमंत आहेत आणि मनाने गरीब आहेत.' तिसऱ्या यूजरने लिहलं, 'या मुलांना बघून वाईट वाटतं, मी १०० रुपये देऊ शकलो असतो, एवढं कमवून काय फायदा?' तर एक यूजरने लिहिलं, 'खरोखरच मनाने गरीब आहे.' दरम्यान रश्मिकाच्या आगामी चित्रपटा बाबत बोलायचं झालं तर 'पुष्पा' नंतर रश्मिका आता बॉलिवूड चित्रपटाची तयारी करत आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3G3IEKK