मुंबई- जेष्ठ गायिका यांना करोनाची लागण झाल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांना ब्रीच कॅंडी इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. दिवसागणिक दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मंगेशकर कुटुंबियांकडून त्यांच्या तब्येतीची माहिती वेळोवेळी देत आहेत. मध्यंतरी त्यांची प्रकृती खालावली असून प्रकृती गंभीर असल्याच्या अफवा सोशल मीडियावर फिरत होत्या. मात्र हे सगळं खोटं असल्याचं ट्वीट लता मंगेशकर यांच्या अकाऊंटवर करण्यात आलं. त्यानंतर आता प्रसिद्ध भोजपुरी गायक आणि अभिनेता याने फेसबुक लाइव्ह दरम्यान भावुक झाला. त्याने नेटकऱ्यांना हात जोडून विनंती करत अशा अफवा पसरवू नका असं सांगितलं. खेसारी लालने रविवारी एक फेसबुक लाइव्ह केलं होतं. यात चाहत्यांशी गप्पा मारताना त्याने लतादीदींच्या प्रकृतीबाबत पसरत असलेल्या अफवांबद्दल खंत व्यक्त केली. तो म्हणाला, 'बरेच लोक खोट्या बातम्या पसरवत आहेत की लता दीदी यांची प्रकृती खालवली आहे तर काहींनी त्या आपल्यात नाही अशाही बातम्या पसरवल्या होत्या. त्या लोकांना माझी विनंती आहे की, कृपया अशा बातम्या पसरवू नका.' यासोबतच खेसारीने जनतेला हात जोडून आवाहन केलं की, त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात. खेसारी लाल यादवने हात जोडून जनतेला आवाहन केले खेसारी लाल यादव म्हणाला 'आपल्या भारतात एक अशी गायिका आहे, अशी एक सरस्वती आहे, जिला ऐकण्यासाठी प्रत्येक व्यक्ती उत्सुक आहे. मी लोकांना सांगू इच्छितो की ती आई लवकर बरी व्हावी. त्यांचे आशीर्वाद प्रत्येक कलाकाराला आणि भारताला लाभोत असं मला वाटतं.' डॉक्टरांनी जारी केले नवीन निवेदन ब्रीच कँडी इस्पितळातील डॉक्टरांनी विनंती वजा निवेदन सादर करत म्हटलं की, ' लता मंगेशकरांच्या प्रकृतीत किंचीत सुधारणा झाली आहे. लता दीदी आधीपेक्षा ठीक आहेत आणि त्या हळूहळू बऱ्या होत आहेत. त्यामुळे कृपया करून त्यांच्या प्रकृतीसंबंधीत अफवा पसरवू नका आणि अशा अफवांवर विश्वासही ठेवू नका.' दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार लता दीदींनी १६ जानेवारीच्या रात्री लता मंगेशकर यांनी पहिल्यांदा जेवण केलं. तसंच दुसऱ्या दिवशी व्यवस्थित नाष्टाही केला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3IEHOpy