Full Width(True/False)

आजाराने परवीन बाबींना एकटं पाडलं, बिग बींवर केलेले आरोप

मुंबई- यांना भारतीय सिनेसृष्टीतील स्त्रियांचे रूढ प्रतिनिधीत्व मोडून काढण्यासाठी ओळखलं जातं. ७० च्या दशकात जेव्हा अभिनेत्री सलवार सूट आणि साडी नेसून काम करताना दिसायच्या तेव्हा परवीन बाबी यांनी त्यांची बोल्ड स्टाईल दाखवली. परवीन बाबी यांनी जवळ जवळ तीन दशकं मोठ्या पडद्यावर राज्य केलं आणि २० जानेवारी २००५ रोजी जगाचा निरोप घेतला. एक मध्यमवर्गीय मुलगी ते पहिला सिनेमा परवीन बाबी यांचा जन्म ४ एप्रिल १९४९ ला सौराष्ट्र मधील जुनागढ इथे झाला. एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्म झाला. शिक्षणाबाबत बोलायचं झालं तर त्यांनी सेंट झेविअर्स कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात बीए केलं. त्यानंतर त्या मॉडेलिंगमध्ये करिअर करत होत्या, तेव्हाच परवीन चित्रपट दिग्दर्शक बी.आर. इशारा यांना भेटल्या. असं म्हटलं जातं की, परवीन यांना सिगरेट ओढताना पाहून बी.आर यांनी ठरवलं की परवीन यांना त्यांच्या चित्रपटाची नायिका करायचं. परवीन यांनी पहिल्यांदा १९७३ च्या 'चरित्र' सिनेमात क्रिकेटर सलीम दुर्रानी सोबत काम केलं होतं. हा सिनेमा बीआर यांनी दिग्दर्शिक केला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी दाखवली नसली तरी परवीन बाबींची जादू प्रेक्षकांवर चालली. तीन अफेअरनंतरही परवीन बाबी एकट्या असं म्हटलं जातं की परवीन यांचं पहिलं अफेअर डॅनी यांच्यासोबत होतं. डॅनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते आणि परवीन चार वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर परवीन यांच्या आयुष्यात कबीर बेदी आले. ते तीन वर्ष एकत्र राहिले, पण हे नातंही फार काळ टिकलं नाही. नंतर प्रेमभंग झालेल्या परवीन यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आधार घेतला. हा तो काळ होता जेव्हा परवीन बाबी हे हिंदी सिनेसृष्टीतं एक प्रसिद्ध नाव होतं आणि महेश भट्ट एक अयशस्वी दिग्दर्शक होते. महेश यांच्यासोबत नात्यात असताना परवीन यांना पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झाला होता. अमिताभ यांच्या विरोधात केली होती तक्रार दाखल आणि परवीन बाबी यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं. असं म्हटलं की एक काळ असा होता की ते नात्यात असल्याच्या अफवा होत्या. मात्र, या अफवा वाढल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी हे नातं तोडलं. यानंतर परवीन यांनी बिग बींवर अनेक गंभीर आरोप केले. अमिताभ यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला, तसेच ते आंतरराष्ट्रीय गुंड असल्याचा आरोप त्यांच्यावर अभिनेत्रीने केला. एवढंच नाही तर अमिताभ बच्चन यांनी अपहरण करून एका बेटावर नेल्याचा दावा परवीन यांनी त्यावेळी केला होता. एवढंच नाही तर अमिताभ यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून उजव्या कानाखाली ट्रान्समीटर किंवा चिप लावली आहे असंही त्या म्हणाल्या होत्या. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं होतं, पण जेव्हा परवीन यांना पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया झाल्याचं निदान झालं तेव्हा सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले. मृत्यूचं कारण परवीन बाबी यांचा मृत्यू २२ जानेवारी २००५ रोजी त्यांच्या राहत्या घरी झाला. त्यांच्या घराबाहेर अनेक दिवस वृत्तपत्रे आणि दुधाच्या पिशव्या पाहून त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. माहिती मिळताच पोलिसांनी दरवाजा तोडला आणि घरात परवीन यांचा मृतदेह सापडला. परवीन यांचा मृत्यूचं कारण एकटेपणा असल्याचं सांगितलं जातं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3GUlIP7